Monday, April 15, 2024
Homeपुणेलोणावळामिरा महिला बहू उद्देशीय सेवाभावी संस्थेच्या सदस्यांनी दिल्या विध्यार्थी व आदिवासी मुलांना...

मिरा महिला बहू उद्देशीय सेवाभावी संस्थेच्या सदस्यांनी दिल्या विध्यार्थी व आदिवासी मुलांना बालदिनाच्या शुभेच्छा..

लोणावळा (प्रतिनिधी):देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती ( 14 नोव्हेंबर ) रोजी बालदिन म्हणून साजरी करण्यात येते.
यानिमित्ताने लोणावळ्यातील मिरा महिला बहूउद्देशीय संस्थेच्या वतीने लोणावळा नगरपरिषद उर्दू माध्यमिक विद्यालय भांगरवाडी मधील चिमुकल्या विध्यार्थ्यांना खाऊ वाटप करून बालदिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच फोर बाय टाकी परिसरातील आदिवासी मुलांबरोबर केक कापून त्यांना खाऊ वाटप करण्यात आला.
यावेळी मिरा महिला बहूउद्देशीय संस्थेच्या संस्थापिका रेश्मा शब्बीर शेख, सदस्या दिक्षा मोरे, सुरभी गुप्ता, सनोबर बागवान, सोनल, व सोनम निकम आदींनी शालेय विध्यार्थी व आदिवासी बालकांना बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
तसेच उर्दू शाळेतील इयत्ता 9 ते 10 च्या विध्यार्थीनींना संस्थेच्या वतीने मोफत प्रशिक्षण देणार असल्याची ग्वाही रेश्मा शेख यांनी शिक्षकांना दिली.तर त्यासाठी जास्तीत जास्त विध्यार्थीनीं याचा लाभ घ्यावा असेही त्यांनी सांगितले.
- Advertisment -

You cannot copy content of this page