Friday, June 14, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडमुस्लिम समाजाला आरक्षित जागा व सभागृह बांधण्यासाठी सर्वतो प्रयत्न करणार-आमदार महेंद्रशेठ थोरवे..

मुस्लिम समाजाला आरक्षित जागा व सभागृह बांधण्यासाठी सर्वतो प्रयत्न करणार-आमदार महेंद्रशेठ थोरवे..

कर्जत मुस्लिम समाजाचे आरक्षित जागा मिळाली म्हणून , आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्याकडे साकडे…

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे )सर्वधर्मसमभावाची दिशा घेऊन धर्म – जात – पंथ न बघता सामाजिक बांधिलकी जपत सर्व धार्मिक – सामाजिक कार्यात कर्जतमधील मुस्लिम समाज नेहमीच अग्रेसर असतो.इतरही धार्मिक व सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी शासकीय आरक्षित जागेचा भूखंड मिळाल्यास त्यात छोटेखानी सभागृह बांधून समाजाची व कर्जतकरांची सेवा करण्याच्या उद्दात हेतूने मुस्लिम समाज कर्जत , अध्यक्ष व सर्व समाज कार्यकर्ते यांनी कर्जत – खालापूर मतदार संघाचे आमदार महेंद्रशेठ थोरवे यांची शिवतीर्थ – पोसरी येथे सोमवार दि . १९ डिसेंबर २०२२ रोजी भेट घेऊन मुस्लिम समाजाला सभागृह बांधण्यासाठी आरक्षित जागा मिळावी ,अश्या मागणीचे निवेदन देण्यात आले.
यावेळी कर्जत मुस्लिम समाज बांधव सैदू शेख – अध्यक्ष – मुस्लिम समाज कर्जत , नदीम युसुफ खान – मुस्लिम समाज कार्यकर्ता , रशीद मुल्ला , फारूक मुल्ला , शादाब शेख , सफूवान चौगुले , शबाब टीवाले , सलमान शेख , गुलाब अन्सारी , इरफान खलिफा ,नुरा शेख , हैदर शेख , इस्मारल दिवान ,खुदबुद्दीन शेख ,इम्रान मुल्ला जुबेर मुल्ला , वसीम मुक्री , शोहेब शेख , आणि अनेक मुस्लिम समाज बांधव यावेळी उपस्थित होते.
मुस्लिम समाजासाठी शासकीय जागा आरक्षित करून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी सभागृह असणे गरजेचे असून आता असलेली मस्जितची ऐतिहासिक वास्तू कमी पडत असल्याने लवकरच मुस्लिम समाजाला सभागृह बांधण्यासाठी जागा व निधी उपलब्ध करून दिला जाईल , असे आश्वासन कर्जत मुस्लिम समाजाला आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी दिले आहेत .आमदार महेंद्रशेठ थोरवे हे दिलेले आश्वासन नेहमीच पूर्ण करत असल्याने सर्व मुस्लिम समाजाला दिलासा मिळाला असून त्यांनी कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ थोरवे यांचे आभार व्यक्त केले आहेत.
- Advertisment -

You cannot copy content of this page