Thursday, June 1, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडराजकारणाने गावातील वातावरण दूषित न करता शांत ठेवा , म्हणून दिपोत्सव होणे...

राजकारणाने गावातील वातावरण दूषित न करता शांत ठेवा , म्हणून दिपोत्सव होणे गरजेचे-सुधाकर शेठ घारे..

बेंडसे गावात अखंड हरिनाम सोहळा उत्साहात संपन्न…

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते .वारकरी संप्रदायाची पायारूपी मुहूर्तमेढ रोवणारे ” ज्ञानोबा माऊली ” तर संत नामदेवांच्या अभंगाने ज्ञान रुपी भिंती बांधून त्यावर कळस रुपी अज्ञानाचा अंधकार दूर करणारे संत तुकाराम महाराज यांचा महिमा शतकोन शतके आज ही या महाराष्ट्राच्या पुण्यभूमीत ग्रामीण भागापर्यंत रुजलेले आपण पहात आहोत .रायगड च्या छत्रपतींच्या पावन भूमीत कर्जत तालुक्यातील बेंडसे गावात तीन दिवस ” अखंड हरिनाम सोहळा ” मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
२६ वर्षे परंपरा असलेल्या या अखंड हरिनाम सोहळ्याच्या दिपोत्सवा दिनी वारकरी सांप्रदायचे श्रद्धास्थान मारुती महाराज राणे यांची उपस्थिती बरोबरच राजिप चे मा.उपाध्यक्ष सुधाकर शेठ घारे , माजी सरपंच बाळू थोरवे , शेकापचे जेष्ठ नेते भाई थोरवे , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला ता.अध्यक्षा रंजना धुळे , अविनाश कडू , दिलीप माळी , सागर कांबेरे , भातगाव पोलीस पाटील , डी के भोईर , कृष्णा भगत , रामदास शिर्के , रमेश बोराडे , सुनील ठाकूर , संभाजी थोरवे , त्याचप्रमाणे बेंडसे ग्रामस्थ , महिलावर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
यावेळी दिपोत्सव झाल्यावर उपस्थित ग्रामस्थांना संबोधित करताना मा. राजिप उपाध्यक्ष सुधाकरशेठ घारे म्हणाले की , आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यात जन्मास आलो , हे आपले पुण्य आहे , याच भूमीत संत महंत जन्मास आले , या हरिनामात ज्ञान आहे , समाजातील अंधकार रुपी अज्ञान दूर करण्यास असे दिपोत्सव होणे गरजेचे आहे , अण्णा महाराजांचे काम खूप अलौकिक आहे , गावागावात जाऊन त्यांनी एकमेकांचा होणारा द्वेष या भक्ती मार्गाने दूर केला , यावर प्रकाश टाकला , तर ग्रामस्थांनी राजकारण – समाजकारण – भक्तिमार्ग हा त्या त्या वेळी करावा , राजकारणाने गावातील वातावरण दूषित न करता शांत ठेवा ,आनंदी वातावरण हे वारकरी सांप्रदाय क्षेत्रातून होत असते , असे मोलाचे मार्गदर्शन केले.

तर राष्ट्रवादी काँग्रेस महिला ता.अध्यक्षा रंजना धुळे म्हणाल्या की , आपली भूमी हि संतांची भूमी आहे , भजन – कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन येथील संतांनी केले , विज्ञानाने जरी सुख समाधान आले , गती जरी आली असली पण त्यातून स्पर्धा निर्माण झाली व स्पर्धेमुळे एकमेकांत द्वेष निर्माण झाला आहे , पण हरिनामात गोडवा आहे , मनाला नियंत्रण करण्यासाठी हरिनामाची गरज आहे , असे दीपोत्सव आज सर्वत्र होणे गरजेचे आहे तरच आपल्याला अंधकारातून प्रकाशाकडे , अज्ञानातून – ज्ञानाकडे ,मार्ग मिळेल.असे मोलाचे विचार मांडले.
तसेच सुनील ठाकूर यांनी बेंडसे गावात प्रत्येक कार्यक्रम मोठ्या उत्साहात होतात , आज प्रत्येकाने स्वताच्या अंतर्मनात डोकावून बघा ,असा मोलाचा सल्ला उपस्थितांना दिला . भाई थोरवे यांनी देखील आपले विचार मांडले . यावेळी या दिपोत्सव सोहळ्यास बेंडसे ग्रामस्थ , महिला वर्ग , तरुणांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.

You cannot copy content of this page