if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
लोणावळा : लोणावळा शिवसेना माजी शहर प्रमुख राहुल शेट्टी यांच्यावर भर चौकात मारेकऱ्यांनी गोळया घालून धारदार शस्त्राने खुनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना सोमवार दि. 26 रोजी घडली होती. त्यासंदर्भात सौम्या शेट्टी यांनी लोणावळा शहर पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली होती.
त्यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार पाच जनांसह एका अज्ञाता विरोधात गुन्हे दाखल करून त्यातील दोघांना लोणावळा शहर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांच्या पथकाने सोमवार दिवस अखेर ताब्यात घेतले होते.ताब्यात घेतलेले सुरज अगरवाल व दिपाली भिल्लारे या दोघांना वडगाव न्यायालयात हजर केले असता वडगाव न्यायालयाने त्या दोघांना पुढील तपासासाठी पाच दिवस 31 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
तसेच लोणावळा शहर पोलीस स्टेशन व पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा ( एलसीबी ) ने आणखी दोन संशयितांना चौकशी साठी ताब्यात घेतले असून राहुल शेट्टी हत्ते प्रकरणातील मुख्य आरोपीला पुणे येथून ताब्यात घेण्यात आले. इब्राहिम युसूफ खान ( वय 30, सध्या रा.सय्यदनगर, गल्ली नं. 6, बी. लाईन हडपसर, पुणे. मूळ राहणार शहावल्ली मोहल्ला, कब्रस्तान समोर, लातूर ) व मोहन उर्फ थापा देवबहादूर मल्ला ( वय 47, सध्या रा. बॅटरी हिल खंडाळा मूळ गाव भैरवा, लुंबिनी, नेपाळ या दोघांना पुणे येथून ताब्यात घेतले आहे.
घटनेत वापरण्या आलेली शस्त्र अद्याप मिळाली नसून पुढील तपास लोणावळा शहर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण पथक करत आहे. मुख्य आरोपीस ताब्यात घेतले असून खुनामागचा छडा लवकरच लावला जाईल असे लोणावळा उपविभागीय पोलीस सहाय्यक अधीक्षक नवनीत कॉवत व लोणावळा शहर पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.