रिक्षातून प्रवास करणाऱ्या महिलेचे 93 हजाराचे दागिने लंपास..

0
117

तळेगाव दाभाडे – रिक्षातून प्रवास करत असलेल्या महिलेसोबत प्रवास करून तीन अनोळखी महिलांनी महिलेच्या नकळत पर्समधून 93 हजारांचे दागिने चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार प्रकार शुक्रवार दि.22 रोजी दुपारी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास तळेगाव – चाकण रोडवर इंद्रायणी कॉलेज समोरील बस थांब्याच्या जवळपास घडला.

जयश्री जयवंत शिगवणकर ( वय 52 , रा . तळेगाव दाभाडे ) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनमध्ये तीन अनोळखी महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तळेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , फिर्यादी शुक्रवारी दुपारी पावणे पाच वाजता तळेगाव चाकण रोडवरील इंद्रायणी कॉलेज समोरील बस थांबा ते तळेगाव स्टेशन चौक या दरम्यान रिक्षातून प्रवास करत होत्या . त्यावेळी तीन महिला फिर्यादीच्या रिक्षात बसल्या . त्या तीन महिलांनी फिर्यादीच्या नकळत त्यांच्या पर्समधून 43 ग्रॅम वजनाचे 93 हजारांचे सोन्याचे दागिने हातचलाखी करून चोरून नेले आहे. तळेगाव दाभाडे पोलीस अधिक तपास करीत आहेत.