लायन्स क्लब ऑफ डायमंड लोणावळाच्या वतीने ठाकर बांधवांना कपडे व खाऊचे वाटप…

0
132

लोणावळा दि.16:लायन्स क्लब ऑफ डायमंड लोणावळाच्या वतीने 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त कुणे गाव येथील ठाकर वस्तीत साड्या व खाऊचे वाटप करण्यात आले.


स्वातंत्र्य दिनाच्या 75 व्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त लायन्स क्लब ऑफ डायमंड लोणावळाच्या वतीने कुणे गाव ठाकर वस्तीतील तीस आदिवासी महिलांना साड्या वाटप करण्यात आल्या तसेच अमृतमहोत्सवाचा आनंद साजरा करताना तेथील लहान मुलांना चॉकलेट व बिस्कीट खाऊ वाटप करण्यात आला.

कोरोनाचे सर्व नियम पाळत ठाकर वस्तीतील ठाकर कुटूंबांबरोबर स्वातंत्र्यदिनाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी लायन्स क्लब ऑफ डायमंड लोणावळा अध्यक्ष लायन अनिल गायकवाड,झोन चेअरमन लायन दाऊदभाई खासरावाला, ट्रेजरर लायन राजेशभाई आगरवाल, लायन शारदा अनिल गायकवाड, लायन वैभव गदादे, लायन भरत चिले यांसमवेत सर्व कुणे ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच, सदस्य आणि ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.