लोकल सेवेच्या कमतरतेमुळे लहान विध्यार्थ्यांना करावी लागते कसरत, प्रशासनाने दखल घ्यावी !

0
165

लोणावळा : रेल्वे लोकल सेवा पूर्वव्रत सुरु नसल्यामुळे मावळातील अनेक लहान सहान विध्यार्थ्यांना शाळेत हजेरी लावण्यासाठी जीव घेणी कसरत करावी लागत आहे.

कोविड 19 च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने लॉक डाऊन केले होते. तसेच त्याबरोबर रेल्वे प्रशासनाने लोकल सेवा बंद केली होती. परंतु कोविडचा कहर कमी होत असल्याच्या पार्शवभूमीवर शासनाने सर्व निर्बंध हटविले तसेच शाळा, विद्यालये व महाविद्यालये पूर्ववत सुरु केली असून, रेल्वे प्रशासनाने दिवसभरात फक्त आठच पुणे लोणावळा पुणे या लोकल सुरु ठेवल्याने कामशेत पासून लोणावळ्याला शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांचे हाल होत आहे.

संदर्भ असा की सध्या लोकल सेवा पूर्ववत नसल्यामुळे पी एम पी एल ही बस सेवा ऐन वेळी उपलब्ध आहे परंतु या बस मध्ये कामशेत पासून लोणावळ्या पर्यंत 26 रुपयांची तिकीट या लहान विध्यार्थ्यांना दयावी लागत आहे. यामुळे अनेक मध्यम वर्गीय पालकांना रोजचे एवढे पैसे देने शक्य नाही, तसेच पालक मुलांना शाळेच्या प्रवासासाठी जे गाडी भाडे देतात ते या बस सेवेसाठी अपुरे असल्यामुळे अनेक लहान विध्यार्थी पैसे वाचविण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून महामार्गावरील भेटेल त्या वाहनाने प्रवास करत असल्याचे चित्र मावळात दिसत आहे.

रेल्वे प्रशासनाने आपली रेल्वे सेवा कोविडचा कमी होणारा प्रसार लक्षात घेऊन दिवसभरात पुणे लोणावळा पुणे या आठ लोकल रेल्वे मार्गावर सुरु ठेवल्या आहेत.परंतु सध्याची स्थिती लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने लोकल सेवा वाढवण्याबद्दल सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी मावळ तालुक्यातील मध्यम वर्गीय पालक वर्गाकडून करण्यात येत आहे.आणि यासाठी मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके व मावळ, मुळशी तालुक्याचे जिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी या बाबत प्रामुख्याने लक्ष घालावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.