लोणावळा एस टी बस स्थानकात पुन्हा लालपरीची लगबग…

0
182

लोणावळा : एस टी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपानंतर आता पुन्हा एकदा लोणावळा एस – टी स्थानकात लालपरीची लगबग सुरु झाली असून राज्यभारत एस टी सेवा पूर्ण क्षमतेने सुरु होत आहे .

आज शुक्रवार दि.22 पासून जनसामान्यांचा आधार असलेली लालपरी पुन्हा एकदा सुसाट सुटली आहे . उच्च न्यायालयाने दिलेल्या अल्टीमेटम नंतर कर्मचारी कामावर हजर झाले असून एसटी सेवा पूर्ववत सुरु होत आहे . एसटी कर्मचा – यांच्या संपाचा तिढा तब्बल पाच महिने चालला . एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करा या प्रमुख मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता.त्यानंतर काही अन्य मागण्या देखील कर्मचाऱ्यांनी केल्या या मागण्यांवर विचार करताना राज्य शासनाने व एसटी महामंडळाने काही पावले मागे येऊन कर्मचाऱ्यांच्या काही अटी मान्य केल्या.

राज्य शासन , एसटी महामंडळ काही पावले मागे येऊन काही मागण्या मान्य करत असताना देखील कर्मचारी एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीवर ठाम होते . त्यानंतर हा वाद न्यायालयात गेला.एका समितीची स्थापना करण्यात आली.समितीला 12 आठवड्यात त्यांचा निर्णय देण्याची मुदत ठरली होती.

12 आठवड्यानंतर समितीने निर्णय दिला कि , एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करणे शक्य नाही .हा निर्णय राज्य शासनाने स्वीकारला . त्यानंतर कामगारांना कामावर हजर होण्याची विनंती राज्य शासनाकडून करण्यात आली. कामगारांनी राज्य शासनाच्या आणि एसटी महामंडळाच्या आवाहनाला प्रतिसाद न देता संप सुरूच ठेवला.

त्यानतंर उच्च न्यायालयाने याप्रकरणी कर्मचाऱ्यांना 22 एप्रिल पर्यंत कामावर हजर होण्याचा अल्टीमेटम दिला.राज्याच्या दुर्गम भागात राहणारे नागरिक तसेच विद्यार्थ्यांना एसटी संपाचा मोठा फटका बसला आहे . महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेली लालपरी बंद पडल्याने सर्वसामान्य नागरिकांची मोठी गैरसोय झाली . त्यात खाजगी वाहन चालकांनी ज्यादा पैसे आकारण्यास सुरुवात केली . पर्याय नसल्याने नागरिक खाजगी बसेस आणि अन्य वाहनांनी प्रवास करत होते. आता एस टी बस सेवा पूर्ववत सुरु झाल्याने नागरिक व शालेय विध्यार्थ्यांना खुप मोठा दिलासा मिळाला आहे.