Thursday, September 28, 2023
Homeपुणेलोणावळालोणावळा खंडाळा टॅक्सी चालक मालक संघटनेची नूतन कार्यकारिणी जाहीर…

लोणावळा खंडाळा टॅक्सी चालक मालक संघटनेची नूतन कार्यकारिणी जाहीर…

लोणावळा(प्रतिनिधी): महाराष्ट्र वाहतूक सेना संलग्न लोणावळा खंडाळा टॅक्सी चालक मालक संघटनेची नूतन कार्यकारिणी मंगळवार दि.9 मे रोजी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व महाराष्ट्र वाहतूक सेना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महेश गोपाळ केदारी यांच्या अध्यक्षेतेखाली जाहीर करण्यात आली. त्याबाबत नियुक्तीचे पत्रक त्यांनी प्रकाशित केले आहे.
वाहतूक दारांना न्याय व व्यवसाय मिळवून देण्यासाठी ही नूतन कार्यकारिणी काम करणार असून विस्तारित कार्यकारणी लवकरच जाहीर केली जाईल अशी माहिती महाराष्ट्र वाहतूक सेना संलग्न लोणावळा खंडाळा टॅक्सी चालक मालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेश केदारी यांनी दिली.
जाहीर नूतन कार्यकारणी नुसार महाराष्ट्र वाहतूक सेना संलग्न लोणावळा खंडाळा चालक मालक संघटनेच्या अध्यक्षपदी योगेश अनिल गवळी, कार्याध्यक्ष पदी हेमंत मेने, उपाध्यक्ष पदी पुषपिंद्र सिंग आनंद, काशिनाथ येवले, अमर जंगम, खजिनदार पदी मंगेश कदम,सेक्रेटरी पदी अजय लुंकड तर सहसेक्रेटरी पदी जावेद गनी शेख अशी वर्णी करण्यात आली आहे.
- Advertisment -