Wednesday, May 29, 2024
Homeपुणेलोणावळालोणावळा नगरपरिषद हद्दीत खंडाळा ठाकरवाडी येथे डुकरांचा सुळसुळाट, स्थानिकांचे आरोग्य धोक्यात…

लोणावळा नगरपरिषद हद्दीत खंडाळा ठाकरवाडी येथे डुकरांचा सुळसुळाट, स्थानिकांचे आरोग्य धोक्यात…

लोणावला (प्रतिनिधी): लोणावळा नगरपरिषद हद्दीतील ठाकरवाडी, शनीमंदिर मागे खंडाळा याठिकाणी मोकाट गाव डुकरांचा सुळसुळाट झाला असून त्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. लोणावळा नगरपरिषदेणे याचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे.
काही महिन्यांपूर्वीपासून लोणावळा शहर परिसरात ठाकरवाडी खंडाळा येथे गाव डुक्कर बहु संख्येने मोकाट असुन त्यामुळे तेथे घानीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.त्यामुळे येथील रहिवासी यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहेच, परंतु डुकरांच्यामुळे तेथील नागरीक व शाळकरी मुले तसेच त्या ठिकाणी जोशाबा मजूर संघटनेची अंगनवाडीतील लहान मुले यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे.
आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊन अंगणवाडी शाळेतील अनेक मुले आजारी पडत आहेत.तरी या मोकाट डुकरांचा प्रशासनाने लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी जोशाबा मंजूर संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच यावर प्रशासनाने काना डोळा केल्यास तिव्र आंदोलन करण्यात येईल असे आवाहन जोशाबा मजूर कष्टकरी संघटनेचे अध्यक्ष अंकुश चव्हाण, उपाध्यक्ष नामदेव राठोड यांनी निवेदनात केले आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page