Thursday, June 13, 2024
Homeपुणेलोणावळादोन वर्षीय चिमूरडीचा स्वीमिंग पूल मध्ये पडून मृत्यू, मिर्जा बंगलो खंडाळा येथील...

दोन वर्षीय चिमूरडीचा स्वीमिंग पूल मध्ये पडून मृत्यू, मिर्जा बंगलो खंडाळा येथील घटना..

लोणावळा (प्रतिनिधी): खंडाळा परिसरातील एका खाजगी बंगल्याच्या स्वीमिंग पूलच्या पाण्यात पडून दोन वर्षीय चिमूरडीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दि.27 रोजी सकाळी 9:15 वा. च्या सुमारास मिर्जा बंगलो खंडाळा, हिलटॉप कॉलनी येथे घडला आहे.या बाबत कार्निवल विला बंगलोचे मालक विधी रणछोडदास तेजुजा रा . खंडाळा हिलटॉप कॉलनी यांनी समक्ष येवून माहीती दिली.
हानियाझैरा मोहम्मदनदीम सैयद (वय 1 वर्ष 11 महिने) असे मयत चिमुरडीचे नाव आहे.याप्रकरणी लोणावळा शहर पोलिस स्टेशन मध्ये अकस्मित मयत सी. आर. पी. सी.174 प्रमाणे दाखल करण्यात आले आहे. याबाबत मोहम्मदनदिम कैसरहुसेन सैयद (वय- 31 वर्षे, धंदा- नोकरी, रा. प्लॅट नं. 503 मैक्सीमा बी कासाबेला गोल्ड़ पलवा डोंबिवली ) यांनी लोणावळा शहर पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार यातील खबर देणार मुलीचे वडील यांनी खबर दिली कि,आम्ही सगळे नाष्टा करत असताना अचानाक बाहेरुन ओरडण्याचा आवाज आला आम्ही जावुन पाहिले असता माझी मुलगी हानियाझैरा ही मिर्जा बंगलोच्या स्विमींग पुलच्या पाण्यामध्ये पडलेली दिसली. त्यानंतर आम्ही तिला पाण्यातुन बाहेर काढुन संजीवनी हॉस्पीटल, लोणावळा येथे घेवुन आलो असता तेथील डॉक्टरांनी हानियाझैरा हीला तपासुन ती मयत आसल्याचे घोषीत केले. वगैरे मजकुरा वरून अकस्मित मयत दाखल करून पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मुजावर हे करत आहेत.
- Advertisment -

You cannot copy content of this page