Wednesday, May 29, 2024
Homeपुणेलोणावळालोणावळा भांगरवाडी परिसरात रस्त्यावर उभी केलेली पल्सर मोटारसायकल लंपास, अज्ञात चोरट्या विरोधात...

लोणावळा भांगरवाडी परिसरात रस्त्यावर उभी केलेली पल्सर मोटारसायकल लंपास, अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल…

लोणावळा (प्रतिनिधी): रस्त्यावर उभी केलेली दुचाकी कोणीतरी अज्ञात चोरट्याने पळवून नेल्याची घटना मंगळवार दि.22 रोजी रात्री 1 वा.च्या सुमारास लोणावळा भांगरवाडी येथे घडली.
याबाबत शुभम प्रताप अवघडे (रा. आगवाला चाळ, लोणावळा, व्यवसाय नोकरी ) यांनी लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात भा. द. वी. कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार फिर्यादी शुभम अवघडे हे तुंगार्ली येथील परफेट कंपनीत नोकरीस आहेत. ते कामावरून सुटून रात्री 1 वाजण्याच्या सुमारास भांगरवाडी मधील जम्बो वडापाव दुकानाच्या गल्लीत त्यांची बजाज कंपनीची 220 पल्सर क्र. MH 14 EQ 7050 ही उभी करून मित्राच्या घरी गेले. थोडया वेळाने परत आल्यावर त्यांची दुचाकी जागेवर न दिसल्याने कोणी तरी चोरट्याने पळवून नेली असल्याची त्यांची खात्री होताच त्यांनी लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि दुचाकी चोरी गेल्याची फिर्याद दाखल केली.
मिळालेल्या फिर्यादे नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला असून लोणावळा शहर पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल महादेव म्हेत्रे हे करत आहेत.
- Advertisment -

You cannot copy content of this page