Friday, July 26, 2024
कार्ला (प्रतिनिधी):कार्ला वेहेरगाव श्री एकविरा देवस्थान येथील विविध समस्या सोडविण्यासाठी आज एकविरा पायथा मंदिर येथे महाराष्ट्र नवनिर्माण विध्यार्थी सेना मावळच्या वतीने बेमुदत उपोषण सुरु करण्यात आले आहे.एकविरा परिसरात विविध समस्या असून त्या सोडविण्यासाठी शासन काहीच प्रयत्न करत नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण विध्यार्थी सेनेना मावळ तालुकाध्यक्ष अशोक वसंतराव कुटे यांनी एकविरा पायथा मंदिर येथे हे बेमुदत उपोषण सुरु केले आहे.

उपोषण कर्त्यांच्या प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे आहेत. 1)कार्लाफाटा ते एकविरा देवी पायथा रस्त्याचे काम अतिशय संथ गतीने व निकृष्ट दर्जाने चालू असून ते उत्तम दर्जाचे व तात्काळ पुर्ण करण्याचे आदेश देण्यात यावे.1)एकविरा देवी पायथा मंदिराजवळ असलेल्या वनविभागाच्या मोकळ्या जागेत लेवल करुन कायमस्वरुपी ती जागा वाहनतळासाठी वापरण्यासाठीचा आदेश काढण्यात यावा.( पे ॲण्ड पार्क ) 3)पायथा मंदिराच्या आसपास पाच पायरी मंदिर , गडावरील मुख्य मंदिर या ठिकाणी अधिक शौचालय व ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी.

4) गडपरिसरातील स्वच्छता संदर्भातील एकविरा देवस्थान वनविभाग मंदिर प्रशासन व ग्रामपंचायत यांना योग्य सूचना देण्यात याव्यात.5) गडाकडे जाणाऱ्या पुरातत्व विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या पायऱ्यांची डागडूजी करून पायऱ्यांच्या बाजूने पिण्याच्या पाण्याची , शौचालयाची तसेच , ठिकठिकाणी निवारा शेडची व्यवस्था करण्यात यावी.6) पाच पायरी पार्किंगच्या लगत असलेल्या वनविभागाच्या जगेमध्ये वनउद्यानाची उभारणी करण्यात यावी.7) पायथा मंदिरापाशी असणाऱ्या एैतिहासिक तलावासाठी बांधण्यात आलेले कठडे तुटलेले असुन ते दुरुस्त करुन तलावालगत असलेल्या जागेत छोटेसे बालउद्यान उभारण्यात यावे.
आदी समस्या ह्या श्री एकविरा देवी मंदिराच्या पर्यटन संदर्भातील प्रमुख समस्या आहेत. शासनाने याची दखल घ्यावी अशी मागणी यावेळी मनसे विध्यार्थी तालुकाध्यक्ष अशोक कुटे यांनी केली आहे.यावेळी या उपोषणात वेहेरगाव – दहिवली गृपग्रामपंचायतीचे आजी – माजी सरपंच , उपसरपंच , ग्रामस्थ , नाणे मावळ महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी यांनी सहभाग नोंदवला.
- Advertisment -

You cannot copy content of this page