
लोणावळा दि15 : स्वातंत्र्य दिनानिमित्त 75 व्या अमृत महोत्सवी लोणावळा रेल्वे स्टेशन येथे सालाबादप्रमाणे ध्वजारोहण संपन्न.कोविड चे सर्व नियम पाळत लोणावळा रेल्वे स्टेशन येथील प्लॅटफॉर्म क्र. दोन वर ध्वजारोहण करण्यात आले.
खंडाळा येथील सरकारी रुग्णालयाच्या प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. सौ. गाडेकर यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण करण्यात आले. सदर ध्वजारोहणास जिआरपी सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णू गोसावी, रेल्वे स्टेशन चे सीटीआय राजेश संधीर व मागील वर्षी ज्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले होते त्या शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त सौ केतकी बकोरे तसेच जिआरपी कॉन्स्टेबल जाधव, कॉन्स्टेबल सावंत,कॉन्स्टेबल पालवी समवेत लोणावळा दूरक्षेत्र येथिल सर्व स्टाफ उपस्थित होता.