Sunday, April 21, 2024
Homeपुणेलोणावळालोणावळा वलवण गावच्या हद्दीत टेम्पो ला अपघात, चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू...

लोणावळा वलवण गावच्या हद्दीत टेम्पो ला अपघात, चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू…

लोणावळा (प्रतिनिधी): मुंबई पुणे महार्गावर वलवण गावच्या हद्दीत टेम्पो अज्ञात वाहनाला मागून धडकून अपघात झाला. या अपघातात टेम्पो चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
वलवण गावच्या हद्दीत बुधवार दि.23 रोजी सकाळी 7 वा. च्या सुमारास हा अपघात घडला. हा अपघात एवढा भीषण स्वरूपाचा होता की यामध्ये टेम्पो चालक गंभीर जखमी होऊन त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
सिद्धप्पा गुरूपाद कुल्लूर (वय 40, रा. साई नगर, मामूर्डी, देहूरोड, पुणे ) असे मृत्यू झालेल्या टेम्पो चालकाचे नाव आहे. याप्रकरणी लोणावऴा शहर पोलीस स्टेशन भाग-5 गुन्हा रजि.नं.195/2022 भा.द.वि.क. 304(अ), 279 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत हैयलप्पा गुरुपाद कल्लूर (वय-32 वर्ष, धंदा-बिगारी, रा. सिंदगी मु.पो.ककऴ मेऴी, ता.सिंदगी जि.विजापुर ) यांनी लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार मयत सिध्दप्पा गुरुपाद कुल्लुर हा आज सकाळी मुंबईकडून पुण्याच्या दिशेने टेम्पो नं – MH-14-FT-105 घेऊन जात असताना. सकाळी सात च्या सुमारास वलवण गावच्या हद्दीत कोणत्यातरी अज्ञात वाहनाला पाठीमागून जोरात धडक लागली. या अपघातात टेम्पो चालक गंभीर जखमी झाला त्यास उपचारासाठी पवना हॉस्पिटल सोमाटणे येथे नेण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.या अपघातात मयत टेम्पो चालकाचीच चुक असल्याचे दिसून येत असून गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश बावकर हे करत आहेत.
- Advertisment -

You cannot copy content of this page