Saturday, November 2, 2024
Homeपुणेलोणावळालोणावळा शहरासाठी 75 कोटीचा निधी आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून मंजूर..

लोणावळा शहरासाठी 75 कोटीचा निधी आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून मंजूर..

लोणावळा : आमदार सुनील शेळके यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मावळातील विकासकामे व निधीबद्दल माहिती दिली. त्यावेळी लोणावळा शहरासाठी आमदार शेळके यांच्या माध्यमातून 75 कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे.


लोणावळा शहरात नगरपरिषदेच्या रुग्णालयाठिकाणी शासनाचे उपजिल्हा रुग्णालय होणार आहे त्यासाठी 40 कोटी 94 लाख रुपये निधी मंजूर झाला असून त्यापैकी 13 कोटी रुपये निधी वर्ग झाला आहे. तसेच लोणावळा शहर पोलीस ठाण्याच्या नवीन प्रशस्त इमारतीसाठी 14 कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे.

वलवण गावातील मुख्य रस्ता, पूल व संरक्षण भिंतीसाठी 1 कोटी रुपये, गोल्ड व्हॅली परिसरातील रस्त्यासाठी 1.5 कोटी रुपये, बारा बंगला ते कालेकर मळा रस्त्यासाठी 50 लाख रुपये, तुंगार्ली येथील व्यायाम शाळा साहित्यासाठी 5 लाख रुपये,त्याच बरोबर जिल्हा नियोजन व विकास परिषद योजनेतून समतानगर अंतर्गत रस्ते, कालेकर मळा येथील भूमिगत केबल टाकून पथ दिवे बसविणे यासाठी 8.59 लाख रुपये, रायवूड भोमे वस्ती ते वनराई सोसायटी व लालटाकी परिसरात भूमिगत केबल टाकून पथ दिवे बसविणे कामासाठी 20.82 लाख रुपये, भांगरवाडी परिसरात पथ दिव्यांचे पोल उभे करून दिवे बसविण्याकामी 34.40 लाख रुपये.

जुना खंडाळा अंध आश्रम ते मुंबई पुणे महामार्गापर्यंत पथ दिव्यांसाठी 44.16 लाख रुपये,जुना खंडाळा महादेव मंदिर तेजय मल्हार वसाहत रस्ता सुधारणा यासाठी 25.52 लाख रुपये, जुना खंडाळा दाभाडे टपरी ते 30 नं. रेल्वे गेट दरम्यान पथ दिवे उभारण्यासाठी 28.11 लाख रुपये,नांगरगाव ते वलवण रस्त्यावर पथ दिवे उभारणी साठी 19.34 लाख रुपये.

नांगरगाव औद्योगीक वसाहत ते नांगरगाव आय टी आय व दिव्या हिलटॉप दरम्यान सौर पथ दिवे व विद्युत पथ दिवे त्यासाठी 29 लाख, कुमार रिसॉर्ट ते भांगरवाडी दरम्यान रस्ता सुधारणा व सुशोभीकरण यासाठी 74 लाख रुपये, आय सी आय बँक ते गोपाळ अपार्टमेंट रस्ता डांबरीकरण यासाठी 19.81 लाख रुपये, मेमन मस्जिद समोरील रस्ता दुरुस्तीसाठी 5.96 लाख रुपये,रामनगर येथील अंतर्गत रस्ते व बंधिस्त गटारी यासाठी 40.41 लाख रुपये निधी मंजूर झाल्याचे आमदार सुनील शेळके यांनी सांगितले आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page