Thursday, September 12, 2024

खोपोली- दत्तात्रय शेडगे


खालापूर तालुक्यातील ग्रामीण आत्करगाव गावात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित झालेले निष्ठावंत शिवसैनिक असून गावातील अधिकाधिक ग्रामस्थ शिवसेनेकडे प्रेरित व्हावे यासाठी गावातील शिवसैनिक व युवासैनिक कंबर कसली असुन 31 मार्च रोजी आत्करगाव गावाच्या प्रवेशव्दारा जवळ शिवसेना शाखा नामफलकाचे अनावरण नवनिर्वाचित शिवसेना उपतालुकाप्रमुखपदी प्रविण पाटील, उद्योजक गणेश पाटील यांच्याप्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आल्याने गावातील शिवसैनिक व युवासैनिकांमध्ये उत्साह संचारला होता.

आत्करगाव गावात अनेक पक्षाचे मातब्बर नेते मंडळी असल्याने येथील राजकीय उलथापालथीकडे साऱ्या खालापूर तालुक्याचे लक्ष लागून राहिलेले असते. त्यामुळे आगामी काळात येणाऱ्या निवडणूकीच्या पाश्वभूमीवर येथील सर्वच नेत्यांनी कंबर कसली असताना शिवसैनिक व युवासैनिक एक पाऊल पुढे काढत शिवसेना बांधणीवर मोठा जोर दिला असताना येथील शिवसैनिक – युवासैनिकांमधील मरगळ बाहेर काढण्यासाठी 31 मार्च रोजी गावाच्या प्रवेशद्वाराजवळ शिवसेना शाखा नामफलकाचे अनावरण करीत आगामी काळातील निवडणूकीचे रणशिंग फुंकल्याने शिवसैनिक – युवासैनिकांमध्ये उत्साह संचारल्याचे पाहायला मिळत आहे.

याप्रसंगी नवनिर्वाचित शिवसेना उपतालुकाप्रमुखपदी प्रविण पाटील, उद्योजक गणेश पाटील, पंचायत समिती विभाग अधिकारी हेमंत पाटील, शाखाप्रमुख नितेश पाटील, संदीप चोनकर, रणजित पाटील, निकेश पाटील, तानाजी पाटील, नयन पाटील, धीरज देशमुख, सुभाष पाटील, रोहिदास पाटील, दिलीप गायकवाड, राजू गायकवाड, रघूनाथ मढवी, रमेश अम्रूते, सुभाष पाटील, नारायण बुधलेकर आदी मान्यवरासह मोठ्या संख्येने शिवसैनिक व युवासैनिक उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page