लोणावळा (प्रतिनिधी) : आज रिपब्लिकन पार्टी (आठवले) गटाची पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदाची निवड जाहीर करण्यात आली. आरपीआय चे नेते तसेच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ही निवड जाहीर करताना. लोणावळा शहरातील माजी जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांची पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदी निवड जाहीर करण्यात आली.
यावेळी रामदास आठवले यांनी एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना आठवले म्हणाले की उद्धव ठाकरे यांच्या चुकीमुळेच शिवसेना फुटली असा घणाघाती आरोप करत, शिंदे सेना हीच खरी शिवसेना असल्याचे सांगितले .ते म्हणाले शिवसेना मोडकळीस आली आहे , तीची अवस्था दैयनिय झाली आहे , काँग्रेस पक्ष दुबळा झाला आहे तर राष्ट्रवादी पक्षाची मुंबईत ताकद कमी असल्याने मुंबई महानगरपालिकेवर यावेळी भाजपा , आरपीआय व शिंदे गट सत्ता स्थापन करणार यात शंका नाही.
मुंबई महानगरपालिकेतील शिवसेनेची सत्ता हिसकावून घेण्याचा आमचा प्रयत्न असून उपमहापौर आरपीआयला मिळावे असा ठराव आज लोणावळ्यात पार पडलेल्या आरपीआयच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत करण्यात आला असल्याची माहिती रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आठवले पुढे म्हणाले , उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादी सोबत महाविकास आघाडी केली नसती तर आज शिवसेना पक्ष फुटला नसता असे सांगितले . शिवसेना व शिंदे गटातील वादावर बोलताना आठवले म्हणाले , शिंदे गटाकडे दोन तृतियांश मेजोरेटी आहे . सर्वाधिक आमदार व खासदार त्यांच्या सोबत असल्याने धनुष्यबाण हे चिन्ह देखील त्यांनाच मिळावे , 16 आमदारांच्या निलंबनाचा मुद्दा देखील चुकीचा आहे . खंडपीठ याबाबत योग्य निर्णय देईल याची खात्री आहे असे सांगितले तसेच दसरा मेळाव्यासाठी ताकदवार शिवसेना कोणाची हे पाहून परवानगी द्यावी असा सल्ला मुंबई महानगरपालिकेला दिला.आठवले म्हणाले , राज्यात फडणवीस व शिंदे सरकार चांगले काम करत आहे.
ओला दुष्काळ त्यांनी जाहिर केला असून केंद्राच्या धर्तीवर मुख्यमंत्री किसान योजना जाहिर करत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम करत आहे . सर्वसामान्यांसाठी सरकार काम करत आहे मात्र शिंदे यांनी मोठा धक्का दिल्याने शिवसेनेच्या गोठात अस्वस्थता आहे .
पुण्याचे महापौर पद शेड्युल कास्ट साठी आरक्षित झाल्यास पुण्याचे महापौर पद तसेच मुंबईचे उपमहापौर पद आरपीआयला मिळावे ही आमची मागणी असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले . महागाईवर बोलताना सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही हाच आमचा प्रयत्न असून केंद्राप्रमाणे राज्याने देखील काही निर्णय घेतल्यास महागाईवर नियंत्रण आणता येईल असे आठवले यांनी सांगितले.