Monday, April 15, 2024
Homeक्राईमलोणावळ्यात मेडिकलचे शटर उचकटून चोरी, चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद…

लोणावळ्यात मेडिकलचे शटर उचकटून चोरी, चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद…

लोणावळा (प्रतिनिधी): भांगरवाडी येथील रात्रीच्या वेळी मेडिकलचे शटर उचकटून आत घुसून चोरी केल्याची घटना दि.15 रोजी रात्री 10 ते दि.16 रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास भांगरवाडी येथे उघडकीस आली आहे.
याप्रकरणी नवनाथ विलास यमगर (वय 29 वर्ष, व्यवसाय मेडीकल, रा. भांगरवाडी, लोणावळा,मावळ,जि.पुणे) यांनी लोणावळा शहर पोलिसांत फिर्याद दिली असून अज्ञात आरोपी विरोधात भा. द. वि. कलम 454, 457, 380 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांत दिलेल्या फिर्यादेनुसार फिर्यादी हे दि.15 रोजी नेहमीप्रमाणे रात्री 11.00 वा. च्या सुमारास मेडीकल बंद करून भांगरवाडी येथे घरी गेले.त्यानंतर दि.16 रोजी सकाळी 09 00 वा. नेहमीप्रमाणे मेडीकल उडण्यासाठी गेले असता मेडिकलच्या कॉउंटर मधून पैसे चोरी गेल्याचा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला.
त्यामध्ये 1.700/- रोख रक्कम 100, 50 दराचे एकुण 19 नोटा असा एकुण 1,700/-रुपये चोरी झाले.
मेडिकलच्या मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल महादेव म्हेत्रे पुढील तपास करत आहेत.
- Advertisment -

You cannot copy content of this page