Monday, April 15, 2024
Homeपुणेलोणावळालोणावळ्यात हिंदू समितीच्या वतीने घोषणा बाजी करत राज्यपाल कोश्यारी यांचा निषेध…

लोणावळ्यात हिंदू समितीच्या वतीने घोषणा बाजी करत राज्यपाल कोश्यारी यांचा निषेध…

लोणावळा (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे आराध्य दैवत वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा हिंदू समिती लोणावळा मावळ व ग्रामीणच्या वतीने आज दिनांक 21 रोजी लोणावळा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे निषेध नोंदविण्यात आला.
डॉ . बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे आयोजित कार्यक्रमात बोलत असताना “ छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श ” तर नितीन गडकरी हे वर्तमान काळातील आदर्श ” असे वादग्रस्त विधान केले . या वादग्रस्त वक्ताव्याने नव्या वाद उफळला आहे. संपूर्ण देशाचे अराध्य दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही . ते याआधीही आदर्श होते, आत्ता ही आहेत आणि पुढेही राहणार असे असताना कोश्यारी यांनी महाराजांची तुलना ही नितीन गडकरी यांच्याशी केल्याने देशभरात नवीन वादाला उधाण आले आहे . कोश्यारी यांच्या निषेधार्थ घोषणा बाजी करत निषेध नोंदविण्यात आला.
या प्रसंगी पुणे जिल्हा शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख,जिल्हा संघटक मच्छिंद्रजी खराडे , पुणे जिल्हा काँग्रेसचे माजी सरचिटणीस किरण गायकवाड, माजी नगरसेवक संजय गायकवाड, राष्ट्रवादी चे पंचायत समिती सदस्य संतोष राऊत, धनंजय काळोखे,अविनाश ढमढेरे,चंद्रकांत गाडे,भारतीय जनता पक्षाचे उमेश तारे, भरत भरणे,दीपक कांबळे,सुनिल गायकवाड,रमेश मते,रुपेश नांदवटे,मनसे चे अमित भोसले,गणेश रोंधळ,शिवसेनेचे माजी उपशहर प्रमुख मारुती खोले, सुनिल इंगुळकर, विशाल पाठारे,माजी उपसरपंच शाम बाबू वाल्मिकी, रिकी मते,सामाजिक कार्यकर्ते सुभाष राशिंगकर,बाळू गाडे, संतोष दहिभाते,नंदकुमार जायगुडे आदी उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page