![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(!empty($image5)); {?>
![]()
} ?>
लोणावळा (प्रतिनिधी):वंदे भारत एक्सप्रेसचे लोणावळा रेल्वे स्टेशन येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिरवा झेंडा दाखवलेली वंदे भारत एक्सप्रेस आज सायंकाळी 6 वा. च्या दरम्यान लोणावळा रेल्वे स्टेशनवर दाखल होताच माजी राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत लोणावळा शहर भाजपच्या कार्यकर्त्यांनी भाजप चा झेंडा दाखवून वंदे भारत रेल्वे एक्सप्रेसचे जल्लोषात स्वागत केले.
यावेळी मा. राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे, रवींद्र अप्पा भेगडे, लो.न.प.माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, भाजपा लोणावळा शहराध्यक्ष रामविलास खंडेलवाल, सुनील तावरे,सामाजिक कार्यकर्ते अन्वर निंबर्गी, नंदू जोशी, आशिष बुटाला,विजय सिनकर आदी भाजपा कार्यकर्त्यांसह लोणावळा रेल्वे सुप्रिडेंट बी. एस.राजपूत, लोणावळा स्टेशन सीसीआय जोहन सूरी,आरपीएफ इन्स्पेक्टर संजीव कुमार राय, हेल्थ इन्स्पेक्टर सतीश कुमार मिना तसेच लोणावळा रेल्वे स्टेशनचे सफाई सुपरवायझर प्रकाश गणेश भाले आदींसह इतर नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.