कामशेत(प्रतिनिधी): राष्ट्रभक्त विनायक सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिका करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करावा , अशी मागणी हिंदू उत्सव समिती कामशेतच्या वतीने करण्यात आली.
सोमवार दि.12 रोजी समीतीच्या कार्यकर्त्यांनी कामशेत चे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्याकडे निवेदनाद्वारे ही मागणी केली . हिंदू उत्सव समितीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , सोशल मीडिया ट्विटर वरील अनुज पाठक ( @ Anuj_Speaks27 ) नावाने अकाऊंट चालवणाऱ्या व्यक्तीकडून स्वातंत्र्यवीर सावरकर , तसेच हिंदू धर्म , हिंदुत्त्व वर सतत आक्षेपार्ह टिप्पणी होते . यामुळे समाजात तेढ निर्माण होऊ शकते . त्यामुळे सदर व्यक्तीवर कारवाई व्हावी , अशा मागणीचे निवेदन समितीने कामशेत पोलिसांना दिले.
यावेळी अर्जुन शिंदे , अभिमन्यु शिंदे , प्रविण शिंदे , समिर भोसले , तुषार पवार , सनी टकले , कमलेश तारु , रमेश परते आदी हिंदु उत्सव समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.