शिक्षिका मनीषा लावरे यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर..

0
46

खोपोली- दत्तात्रय शेडगे
मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीचा राज्यस्तरीय राष्ट्रीय पुरस्कार शिक्षिका मनीषा लावरे यांना जाहीर झाला आहे. मनुष्यबळ विकास लोकसेवा द्वारा राज्यस्तरीय गुणिजन महासमेंलंन पुरस्कार वितरण सोहळा नुकताच जागतिक दिनानिमित्त 4 व 5 आक्टोबर ला झूम अप्स वर घेण्यात आला.
या कार्यक्रमात रायगड जिल्हा परिषद शाळा सवाने ता महाड येथील शिक्षिका मनीषा संपत लावरे यांना देण्यात आला मनीषा लवारे या गेली 20 वर्ष शिक्षण क्षेत्रात काम करीत असून त्या उच्यशिक्षित आहेत, त्याच्या कार्याची दखल घेत त्यांना मनुष्यबळ विकास कादमीचा राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला.
प्रमुख पाहुणे पद्मश्री डॉ विजयकुमार शहा यांच्या हस्ते सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व गौरव पदक देऊन गौरविण्यात आले, त्यांना पुरस्कार मिळताच राज्य अध्यक्ष राजेश सुर्वे, गटशिक्षण अधिकारी यादव मॅडम ,अलिबाग पतपेढीचे व्हा चेअरमन बालाजी गुबनरे व शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी गटशिक्षण अधिकारी यादव मॅडम , केंद्रप्रमुख मोहिते, सवाने ग्रामपंचायतचे सरपंच संदेश बोबडे, आदींसह अनेक मान्यवरांनीअभिनंदन केले आहे.