Wednesday, June 19, 2024
Homeपुणेतळेगावशिरगांव पोलिसांची मोठी कारवाई सोमाटणे येथून चार किलो तीस ग्रॅम गांजा सह...

शिरगांव पोलिसांची मोठी कारवाई सोमाटणे येथून चार किलो तीस ग्रॅम गांजा सह एकास अटक…

तळेगाव (प्रतिनिधी):शिरगांव पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4 किलो 30 ग्रॅम गांजा सह एकास अटक करण्यात आली आहे. सदर कारवाई दि.28 रोजी सायंकाळी 4:30 वा.च्या सुमारास सोमाटणे गावठाण इथे पवना नदीच्या तळेगाव पंप हाऊस शेजारी केली आहे.
या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस शिपाई सदानंद विजय रुद्राक्षे (वय 30) यांनी शिरगांव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार याप्रकरणी आरोपी 1) प्रवीण रमेश शेडगे (वय 30, रा. घर नं.114/ए, सोमाटणे गावठाण, तळेगाव, ता. मावळ, जि. पुणे ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर आरोपी 2) मराठे (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) या दोघांविरोधात एन.डी.पी. एस.कायदा कलम 8 (क), 20 (ब) 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरगांव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 28 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4:30 वा.च्या सुमारास पवना नदीच्या बाजूला तळेगाव पंप हाऊस शेजारी सोमाटणे गावठाण तळेगाव दाभाडे ( ता. मावळ जि. पुणे) इथे ही कारवाई करण्यात आली. नमुद तारखेला सदर ठिकाणी आरोपी प्रविण रमेश शेडगे याच्या कब्जात एकुण 1,00,750 रुपये किमतीचा 4 किलो 30 ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ बेकायदेशिररित्या विक्री करिता जवळ बाळगताना मिळुन आला. तपासात आरोपी शेडगे याने सदर गांजा हा आरोपी क्रमांक 2 मराठे याच्याकडून आणला असल्याचे सांगितले. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक येडे हे करत आहेत.
- Advertisment -

You cannot copy content of this page