Tuesday, May 30, 2023
Homeपुणेलोणावळाश्रद्धा हॉस्पिटलच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त मोफत आरोग्य शिबिर संपन्न…

श्रद्धा हॉस्पिटलच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त मोफत आरोग्य शिबिर संपन्न…

हॉस्पिटल च्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त दि.15 मे रोजी विविध आजारांवर मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन डॉ. शहा व हॉस्पिटल टिम च्या वतीने करण्यात आले होते. या शिबिरात अनेक रुग्णांनी उपस्थित राहुन मोफत शिबिराचा लाभ घेतला.
लोणावळा (प्रतिनिधी): लोणावळ्यातील सुप्रसिद्ध सुवर्ण पदक प्राप्त सर्जन डॉ. शैलेश शहा आणि अंजली शहा यांच्या श्रद्धा हॉस्पिटल चा 25 वा वर्धापन दिन केक कापून मोठया उत्सहात संपन्न झाला.
सदर शिबिरात तज्ञ डॉक्टरांकडून गर्भवती महिलांची तपासणी, स्त्री रोग वांध्यत्व, शस्त्रक्रिया, रक्त तपासणी, एक्सरे, ईसीजी यावर 50% सवलत तर लिव्हर च्या आजारावर तज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी करण्यात आली.
श्रद्धा हॉस्पिटल हे गेली 25 वर्ष गोरगरीब रुग्णांसाठी दुवा बनले असून, हॉस्पिटल कडून अशीच कायम गरजू रुग्णांची सेवा व्हावी अशा शुभेच्छा देण्यासाठी शहरातील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश जैन, सुभाष डेनकर यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page