Friday, June 14, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडसंविधान दिन म्हणजे बहुजनांचा मुक्ती दिन-प्रा. आकिफ डफेदार !

संविधान दिन म्हणजे बहुजनांचा मुक्ती दिन-प्रा. आकिफ डफेदार !

कर्जतमध्ये संविधान गौरव समितीच्या नेतृत्वाखाली संविधान दिन उत्साहात साजरा…

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) संविधान दिन हा आजचा दिवस खऱ्या अर्थाने शोषित – पीडित – गरीब अत्याचार ज्यांच्यावर होत होते त्यांचा स्वातंत्र्य दिवस आहे , बहुजन समाजाचा मुक्तीचा दिवस आहे , असे मत प्रख्यात वक्ते प्राध्यापक आकिफ डफेदार यांनी कर्जतमध्ये संविधान गौरव समिती तर्फे संविधान दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक कर्जत येथे आयोजित केलेल्या व्याख्यान कार्यक्रमात मांडले.
यावेळी विचारपीठावर संविधान गौरव समितीचे अध्यक्ष सुभाष गायकवाड , सभाध्यक्ष ऍड.एथनी डिमेलो , माजी उपनगराध्यक्ष वसंत धर्मा सुर्वे ,प्रथम उपनगराध्यक्ष उत्तम भाई जाधव , आप्पा साळवे , दिपक भालेराव ,शरद मोरे , वसंत कोळंबे , प्रकाशदादा पगारे , विजयभाऊ डाळींबकर नंदागवळी सर , के.के.गाढे , बबन ओव्हाळ , बी.एच.गायकवाड , जी.बी.गायकवाड , सुनील चव्हाण , उद्योजक सुरेश सोनावणे , दौलत ब्राह्मणे , रमेश खैरे , दशरथ जाधव , मधुकर रोकडे , मनोहर ढोले , गुलाब शिंदे , भगवान यादव , गोविंद ढोले , संजय खंडागळे , विष्णू भालेराव , सोपान धनवे , आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी संपूर्ण कर्जत शहरातुन संविधान दिन चिरायू होण्यासाठी संविधान रॅली चे आयोजन करण्यात आले होते . या रॅलीत तालुक्यातील तसेच कर्जत शहरातील अनेक बहुजन व बौद्ध समाज , महिलावर्ग , विद्यार्थी विद्यार्थिनी तरुण वर्ग उपस्थित होते.यावेळी मा.राष्ट्रपती शौर्य पुरस्कार प्राप्त पोलीस उपनिरीक्षक मांडे , डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसर देखभाल बाबत नंदू पोथरकर , रिक्षा चालक संतोष गायकवाड तसेच अनेकांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी संध्याकाळी झालेल्या व्याख्यानमाळेत प्राध्यापक आकिफ डफेदार पुढे म्हणाले की , पूर्वी बहुजनांना शारिरीक आणि मानसिक गुलाम केले होते , शूद्र व साप समोर असेल तर पहिले शूद्राला मारा , सापापेक्षा तो विषारी आहे , असे सांगितले जायचे , एव्हढी घृणा बहुजनांविरोधी होती , यावर प्रकाश त्यांनी टाकला . छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित असलेल्या ” हर हर महादेव ” या पिक्चर चा किस्सा त्यांनी सांगितला , तसेच महाराष्ट्र राज्यपाल कोश्यारी हे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य बोलले , याचा निषेध करत यापूर्वी देखील त्यांनी महापुरुषांची टिंगल केली आहे , सावित्रीबाई फुले यांच्या लग्नाचा विषया बद्दल चुकीचे विधान केले होते , म्हणूनच या विकृत राज्यपालाला येथून हाकलून द्या ,असे संतप्त मत व्यक्त करत रामदेव बाबांचे स्त्रियांबाबत केलेले वक्तव्य चुकीचे आहे ,याचाही त्यांनी संताप व्यक्त केला.
लेखक कानिटकर यांनी पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज वैरागीचे वेशातील किस्सा त्यांनी सांगितले , असे द्वेषजनक माहिती देत , पूर्वी व्यवसायातून जात निर्माण करण्यात आल्या ,आज संविधानाचे चार ही स्तंभ सुरक्षित नाहीत ,म्हणून १०० टक्के आरक्षण होणे गरजेचे असून तरच संविधानाचा समतोल राखला जाईल , हे सांगत संविधान दिन हा बहुजनांच्या मुक्तीचा मार्ग आहे , सर्व अधिकार या संविधानातून महिलांना व तुम्हा – आम्हा सर्वांना मिळाले आहेत , यावर प्रकाश टाकला.
जे पक्ष महापुरुषांचा अपमान करतात , त्या पक्षांना येणाऱ्या निवडणुकीत गाडले पाहिजे म्हणूनच भगवान गौतम बुद्ध ते प्रबोधनकार ठाकरे या महापुरुषांचा संघर्ष वाया घालवू नका ,असे आवाहन देखील त्यांनी उपस्थित बहुजन वर्ग , बौद्ध समाज यांना केले .यावेळी वसंत कोळंबे , सभाध्यक्ष ऍड.एथनी डिमेलो यांनी ही संविधान बद्दल मार्गदर्शन केले. यावेळी सौ.भालेराव यांनी संविधान उद्देशिकाचे वाचन केले , त्यावेळी समस्त उपस्थित बहुजन समाज उभे राहून सामूहिक वाचन करून वचनबद्ध झाले .शिल्पकार साहित्य कला मंडळचे संस्थापक – गुरुवर्य दिवंगत पांडुरंग उर्फ जीवन घोडके यांनी लिहिलेले गीते यावेळी अशोकदादा सोनावणे , मोहन धनवटे ,वामन शिंदे , दामोदर गायकवाड व इतरांनी सादर करून डॉ.बाबासाहेबांनी लिहिलेले संविधानाचे महत्व – अधिकार – संरक्षण – व कायद्याचे ज्ञान गीतांतून सादर केले .
यावेळी आदिवासी कृती समिती , भारतीय चर्मकार महासंघ , वाल्मिकी समाज , मुस्लिम सुन्नी समाज , संभाजी ब्रिगेड , मराठा सेवा संघ , माँ साहेब जिजाऊ ब्रिगेड , बहुजन क्रांती मोर्चा , दिशा केंद्र , फुले – शाहू – आंबेडकर विचार मंच – नानामास्तर नगर , राहुल युवक मंडळ , भीम गर्जना मित्र मंडळ – कर्जत , शिल्पकार तरुण मंडळ – गुंडगे , डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळ – एस.टी. स्टँड , भीम तरुण मंडळ – पंचशील नगर , भीमज्योति सेवा संघ – दहिवली , अशोक मित्र मंडळ – आकुरले , जय कामगार संघटना – कर्जत , भैरवनाथ तरुण मंडळ- मुद्रे – बु ,आदींचे सदस्य उपस्थित होते . सर्वांच्या सहकार्याने मोठया उत्साहात ७३ वा संविधान दिन साजरा झाला.
- Advertisment -

You cannot copy content of this page