Sunday, May 12, 2024
Homeपुणेमावळअवैध धंद्याविरोधातील आमदार शेळके यांच्या आंदोलनास मावळातील वारकरी संप्रदायाचा जाहीर पाठिंबा...

अवैध धंद्याविरोधातील आमदार शेळके यांच्या आंदोलनास मावळातील वारकरी संप्रदायाचा जाहीर पाठिंबा…

मावळ (प्रतिनिधी): आमदार शेळके यांनी मावळातील अवैध दारू धंद्याच्या विरोधात केलेल्या आक्रमक मोर्च्याला मावळ तालुक्यातील वारकरी संप्रदायातील मावळ तालुका दिंडी समाज , पवन मावळ वारकरी समाज , श्रीक्षेत्र घोरावडेश्वर डोंगर प्रासादिक दिंडी , श्री जगद्गुरू संत तुकाराम महाराज सामाजिक ट्रस्ट , आखिल भारतीय वारकरी मंडळ मावळ , अखिल वारकरी संघ मावळ , संत नामदेव महाराज वारकरी दिंडी क्रमांक 102 , जगदगुरु संत तुकाराम महाराज झाड पादुका ट्रस्ट वाकसई आदी दिंडी , ट्रस्ट व संस्थांनी निवेदने देत आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , अवैध धंद्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे . मावळची भूमी ही संतभूमी आहे . या अवैध धंद्यापासून ही भूमी मुक्त व्हावी असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

आमदार शेळके यांचे हे आंदोलन खरोखर यशस्वी ठरले, आंदोलनाच्या दुसऱ्याच दिवशी तालुक्यातील पोलीस यंत्रनेनी गावठी हातभट्टी धंदे उध्वस्त करण्यास सुरुवात केली आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page