Saturday, August 2, 2025
Homeपुणेकामशेतअहिरवडे व चिखलसे येथील 240 जनावरांचे लंपी प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण...

अहिरवडे व चिखलसे येथील 240 जनावरांचे लंपी प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण…

कामशेत (प्रतिनिधी) : मावळ तालुक्यातील चिखलसे व अहिरवडे येथील 240 जनावरांचे लंपी प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले . त्यामध्ये 97 गाई , 35 वासरे व 108 बैल असे एकूण 240 जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले .

यावेळी लंपी प्रतिबंधात्मक लसीकरणामुळे जनावरांना हा आजार होणार नाही . त्यामुळे आपल्या जनावरांना लसीकरण करून घ्यावे , असे आवाहन सरपंच सुनील काजळे यांनी ग्रामस्थांना केले . महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुरांवरील लंपी ( चर्मरोग ) आजारामुळे बळीराजा भयभीत झाला आहे.

लंपी या आजाराची बाधा झाल्याने अनेक जनावरांचा मृत्यू होत आहे . यामुळे राज्य सरकार आणि आरोग्य यंत्रणा देखील सतर्क झाल्या आहेत . राज्यात खबरदारी म्हणून सर्वत्र जनावरांचे लसीकरण सुरु असून त्याच पार्श्वभूमीवर मावळातील चिखलसे व अहिरवडे येथील 240 जनावरांचे लंपी प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झाले.

- Advertisment -

You cannot copy content of this page