Sunday, May 12, 2024
Homeपुणेमावळआर पी आय ( ए ) तालुकाध्यक्ष पदी चंद्रकांत ओव्हाळ यांची निवड...

आर पी आय ( ए ) तालुकाध्यक्ष पदी चंद्रकांत ओव्हाळ यांची निवड जाहीर…

तालुका (प्रतिनिधी): आर पी आय (ए ) च्या तालुकाध्यक्ष पदी चंद्रकांत ओव्हाळ यांची नियुक्ती करण्यात आली. आर पी आय (ए ) चे पुणे जिल्हाध्यक्ष विकास साळवे यांच्या हस्ते निवडीचे पत्रक देण्यात आले.
मा. सरपंच चंद्रकांत ओव्हाळ हे अनेक वर्षांपासून आंबेडकरी चळवळीत सक्रिय आहेत. दांडगा जन संपर्क व शासकीय कामांचा भरघोस अनुभव आणि सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन आर पी आय (ए ) चे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांच्या सुचने नुसार चंद्रकांत ओव्हाळ यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( ए ) पक्षाच्या मावळ तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष अमितभाऊ वर्मा, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष राजेंद्र (आप्पा) गायकवाड व पुणे जिल्हा युवक अध्यक्ष अंकुश चव्हाण आणि इतर अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत. पुणे जिल्हाध्यक्ष विकास साळवे यांच्या हस्ते ओव्हाळ यांना निवडीचे पत्रक प्रदान करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
- Advertisment -

You cannot copy content of this page