Friday, November 22, 2024
Homeपुणेलोणावळाउर्दू माध्यमिक विद्यालयात दहावीच्या विध्यार्थांचा भव्य दिव्य निरोप समारंभ संपन्न...

उर्दू माध्यमिक विद्यालयात दहावीच्या विध्यार्थांचा भव्य दिव्य निरोप समारंभ संपन्न…

लोणावळा : लोणावळा नगरपषदेच्या उर्दू माध्यमिक विद्यालयातील दहावीच्या विरध्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्सहात संपन्न झाला.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक जीशान हनीफ शेख होते तर सुन्नी मुस्लिम जमात ट्रस्ट चे शफी अत्तार, सुन्नी मुस्लिम जमात ट्रस्ट चे उपाध्यक्ष रफीक शेख,ट्रस्टी हाजी इस्हाक पटेल, मा. नगरसेवक हूसेन मन्यार,हाजी सईद खान, हाजी अब्बास खान,फिरोज शैख,तारीक बागवान,सलमान शैख, फिरोज शैख, मुस्लिम बँकेचे चेअरमन जाकिर खलीफा,मा. शिक्षण सभापती बाबु भाई शैख,मा. शिक्षण सभापती जितेंद्र कल्याणजी टेलर,रेहान सय्यद,नवाज शैख, हाजी मेहमूद शैख, हाजी सलीम मुजावर, बाल कृष्ण बलकवडे(सर ),परवेज सय्यद, रमजान खान सर इत्यादी मान्यवारांची प्रमुख उपस्थिती लाभली.

यावेळी बोलताना मिनारा मस्जिद चे इमाम गुलाम यजदानी म्हणाले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अब्दुल कलाम यांनी गरिबीतून शिक्षण घेऊन आपलेच नाही तर संपूर्ण देशाचे नाव जग लौकिक केले आहे त्यांचे कार्य व प्रतिमा लक्षात घेऊन उपस्थित मान्यवरांच्या आशीर्वादाने परीक्षेला सामोरे जावे तसेच उपस्थित मान्यवरांनी विध्यार्थ्यांना केलेल्या मार्गदर्शनातील एक एक वाक्य विध्यार्थांसाठी माणिक मोती सारखे आहे, ते वाक्य विध्यार्थ्यांनी सर्वस्वी लक्षात ठेऊन त्या मार्गावर ठाम राहून शिक्षण घेतल्यास त्यांच्या शैक्षणिक भवितव्यात मार्ग दाखविण्याचे कार्य करेल,जर आपणास यशस्वी बनायचे असेल तर योग्य अभ्यास व योग्य शिक्षण विध्यार्थ्यांनी घेणे गरजेचे आहे असे मार्गदर्शन केले तर

माजी शिक्षण सभापती जितू भाई कल्याणजी टेलर यांनी आपण काय आहोत व आपणास काय बनायचे आहे हे लक्षात घेऊन त्यादृष्टीने अभ्यास करावा व आपली शाळा, आपले पालक व आपल्या शहराचे नाव लौकिक करावे अशी अपेक्षा विध्यार्थ्यांकडे व्यक्त केली आहे.

तसेच उद्योजक जिशान शेख यांनी विध्यार्थ्यांनी अभ्यासातून खूप मेहनत करावी व अशा अभ्यासू विध्यार्थी व दहावी परीक्षेत उच्च स्तरावर पास होणाऱ्या विध्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्यासाठी आम्ही व ट्रस्ट कडून प्रयत्न करू असे प्रतिपादन केले.

सर्व उपस्थित मान्यवरांचे शाळेच्या वतीने गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले तर इयत्ता 10 बोर्ड परीक्षेतील विध्यार्थ्यांना गुलाब पुष्प व पेन मान्यवरांच्या हस्ते प्रदान करून परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

आपल्या शाळेतील हे शेवटचे वर्ष असून आपल्या शिक्षकांनी आपल्या साठी खूप परिश्रम घेतले तसेच आमच्यामध्ये दहावीच्या परीक्षेत उच्च गुणांनी उत्तीर्ण होण्याचा आत्मविश्वास निर्माण केला आहे त्यासाठी आम्ही आमच्या या शाळेचे सर्वस्वी ऋणी आहोत असे मनोगत सर्व विध्यार्थीनी व विध्यार्थ्यांकडून व्यक्त करण्यात आले त्याच बरोबर आपण आपल्या शाळेचे काही तरी देने लागतो या भावनेने सर्व दहावी परीक्षनार्थी विध्यार्थ्यांच्या वतीने शाळेला भेट वस्तू देण्यात आल्या.

उर्दू माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सईद सर यांनी अतिशय हळव्या मनाने आपल्या विध्यार्थ्यांना निरोप देत विदयार्थ्यांनी आपले संपूर्ण लक्ष अभ्यासात केंद्रित करून आपल्या शाळेला ACC बोर्डातून 100% गुण मिळावे आणि आपले पालक व आपल्या शाळेचे नाव लौकिक करावे अशी अपेक्षा व्यक्त करत विध्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. अतिशय खेळी मेळीच्या वातावरणात हा निरोप समारंभ पार पडला.

- Advertisment -

You cannot copy content of this page