Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जत उपकार्यकारी अभियंता यांच्या कार्यकाळात विजेच्या अनेक समस्या उजेडात !

कर्जत उपकार्यकारी अभियंता यांच्या कार्यकाळात विजेच्या अनेक समस्या उजेडात !

लेखी आश्वासनानंतर पोलीस मित्र संघटनेचे उपोषण स्थगित !

भिसेगाव- कर्जत (सुभाष सोनावणे)रायगड जिल्ह्यातील कर्जत वीज कंपनीच्या उपविभागीय कार्यालयात उपकार्यकारी अभियंता प्रकाश देवके यांच्या अंतर्गत येणाऱ्या कर्जत तालुक्यातील वीज कंपनीच्या आठ शाखा अभियंते यांच्या कार्यालयात चाललेल्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांत वीज अधिकारी वर्गांच्या विरोधात संताप खदखदत होता.

वीज बिलांबरोबरच ईतर जीवघेण्या तक्रारींचा खच पडलेला असताना इतर सुविधा देताना करत असलेल्या बेजबाबदारपणाने कळस गाठला होता ,मात्र याविरोधात पोलीस मित्र संघटनेने दंड थोपटले होते.वारंवार तक्रारीला वाटाण्याच्या अक्षता दाखविल्यावर याचा समाचार घेण्यासाठी दि.२८ मार्च २०२२ पासून तीन दिवस ठिय्या आंदोलन , तीन दिवस आमरण उपोषण तर त्यानंतर मागण्या मान्य न झाल्यास आत्मदहन करण्याचा ईशारा संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश कोकण विभागीय अध्यक्ष रमेशदादा कदम व उपाध्यक्ष दशरथभाई मुने यांनी देऊन कर्जत शहरात उपोषण सुरू केले होते.

उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी उपकार्यकारी अभियंता यांनी शरणागती पत्करत सर्व मागण्या मान्य करून दिलेल्या लेखी आश्वासनानंतर अखेर हे उपोषणाचे आंदोलन स्थगित करण्यात आले.यावेळी दिलेल्या लेखी आश्वासनात तालुक्यातील सर्व पोल हे विद्युत ट्रान्सफॉर्मर वर मॅप असतात या सर्वांची यादी देण्यात आली , तालुक्यातील अनेक वर्षे पूर्वीपासून जुने गंजलेले – वाकलेले पोल , जुन्या वायर हे सदर शाखा अभियंता यांच्या जे निदर्शनास आलेले आहेत ते बदलण्यात आले आहेत.

तरीही शाखा अभियंता व सर्व कर्मचारी यांच्याकडून इतर जुने पोल व लटकलेल्या वायरीचे अहवाल मागवून त्यांचे अंदाजपत्रक बनवून मंजुरी घेऊन लवकरात लवकर बदली करण्यात येतील , तालुक्यातील उच्च दाब व लघु दाब वीज वाहिन्यांवरील येणाऱ्या झाडाच्या फांद्या हे वर्षातून दोन ते तीन वेळा सर्व्हे करून छाटण्यात येतात आता देखील अश्या अडथळा ठरणाऱ्या झाडाच्या फांद्या छाटण्यात येतील ,कर्जत तालुक्यात एकूण बंद पडलेले फॉल्टी मिटर ४१७५ आहेत , ते मिटर उपलब्धतेनुसार बदलण्यात येतील , ज्या वीज ग्राहकांकडून त्यांच्या वापरानुसार बिल न घेता सरासरी पेक्षा जास्त बिल घेण्यात आले आहेत.

अशा ग्राहकांना शाखा अभियंता यांच्याकडून लोड बाबतच्या अहवालानुसार व ग्राहकांच्या तक्रारीच्या म्हणण्यानुसार बिल दुरुस्त करून देण्यात येतील , तालुक्यात बसविण्यात आलेले नवीन पोल तसेच झुकलेले पोल यांची संबंधित शाखा अभियंता यांच्याकडून माहिती घेऊन ती आपणास देण्यात येईल , वीज चोरी प्रकरणी पकडलेल्या १३५ अंतर्गत ९६ ग्राहक व कलम १२६ अंतर्गत ३४ ग्राहकांवर कारवाई करण्यात आली आहे , तालुक्यातील सर्व ट्रान्सफॉर्मर जवळील खराब झालेले डिस्ट्रिब्युशन बॉक्स बदलण्याचे काम चालू आहे ,जसे डिस्ट्रिब्युशन बॉक्स उपलब्ध होतील , तसे ते बदलण्यात येतील , तसेच उपाध्यक्ष दशरथ मुने यांनी केलेल्या १३ ऑगस्ट २०२१ रोजीच्या तक्रार अर्जानुसार त्यांचा फॉल्टी मिटर त्वरित बदली करण्यात येईल व बारणे गावातील चार रस्ता येथील पोल १५ दिवसांच्या आत बदली करण्यात येईल .

तरी सगळ्या मागण्यांचा व तक्रारींचे योग्य ते निरसन करण्यात येईल , असे आश्वासन देऊन हे उपोषणाचे आंदोलन मागे घ्या , अशी विनंती करण्यात आली.वीज हि आजच्या युगात अत्यंत किमंती आहे , विजेशिवाय मानवाचे कुठलेच कार्य होऊ शकत नाही . वीज आपल्या दारापर्यंत येण्यासाठी करोडो , अब्जो रुपये खर्च होत असताना त्याची निगराणी राखून ग्राहकांना ती देणे हे ” पाच आकडी ” पगार घेणाऱ्या या ” बुजगावण्या अधिकारी ” वर्गाच्या कधी लक्षात येणार ? तालुक्यातील सर्वच समस्या ” जैसे थे ” ठेवून बेजबाबदार काम करणाऱ्या अधिका-यांना पोलीस मित्र संघटनेने चांगलेच वठणीवर आणल्याचे चित्र या उपोषणातुन दिसून आले . हे उपोषण व आत्मदहन त्वरित काम करण्याच्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले , मात्र केलेले आश्वासन पुढील दिवसांत पूर्ण न झाल्यास पुन्हा अधिक तीव्रतेने हे उपोषण पुन्हा सुरू करण्यात येईल , असे मत कोकण विभागीय अध्यक्ष रमेशदादा कदम व उपाध्यक्ष दशरथभाई मुने यांनी व्यक्त केले.

- Advertisment -

You cannot copy content of this page