भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत हे गाव आता पूर्वी सारखे राहिले नाही , वाढत्या नागरीकरणामुळे येथील लोकसंख्या तसेच इमारतीत भरमसाठ वाढ झाली आहे . रेल्वे गाड्यांमध्ये देखील वाढ झाल्याने बाहेरच्या नागरिकांची आवक – जावक वाढली आहे , म्हणूनच येथील गुन्हेगारी वाढली आहे , चोरीच्या प्रकरणात वाढ झाली आहे.त्यामुळे यावर नियंत्रण ठेवणारी पोलीस यंत्रणा देखील तेवढीच सशस्त्र होणे गरजेचे असताना कर्जत रेल्वे स्थानकाच्या बाहेरच गुन्हेगारांची चेहरा पट्टी ओळखून यावी , म्हणून आधुनिक आणि तंत्रज्ञान युगात गुन्हेगारांचा कर्दनकाळ ठरणारा तिसरा डोळा म्हणजेच ” सीसीटीव्ही ” २४ तास सतर्क रहाणे गरजेचे असताना ते बंद असणे , म्हणजे पोलीस ठाण्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उमटणारे असेच आहे , म्हणूनच कर्जत रेल्वे स्थानकाच्या बाहेर असणाऱ्या मुख्य तीन रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेरे खूप दिवसांपासून बंद असून ते त्वरित सुरू करण्याची मागणी छत्रपती शिवाजी राजे तक्रार निवारण संघटनेने या बातमीच्या माध्यमातून कर्जत पोलीस ठाण्याला केली आहे.
कर्जत रेल्वे स्थानक हे जंक्शन स्थानक आहे . येथे अनेक बाहेरील गाड्या थांबल्या व येथून जात असतात.त्यामुळे बाहेरील गुन्हेगारीत देखील वाढ झाली असून पूर्वीच्या जकात नाका असलेल्या कर्जत रेल्वे स्थानकाच्या बाहेर रात्रीच्या वेळी पोलीस बंदोबस्त नसल्याने ती कमी सीसीटीव्ही कॅमेरे पूर्ण करत असतात.गेल्या एक महिन्यांपूर्वी कर्जत शहरात चोरांनी धुमाकूळ घातला असताना काही सीसीटीव्ही मध्ये हे चोर थेट रेल्वे स्थानकातून येऊन भिसेगाव – जुने एस टी स्टँडकडे जाताना दिसत होते. त्यामुळे मुख्य भागातील सीसीटीव्ही बंद का ठेवले आहेत , याचे कोडे उमगत नसून कर्जत पोलीस ठाणे याकडे दुर्लक्ष का करत आहेत , याबाबत कर्जतकर नागरिकांत संतापजनक चर्चा होत असताना दिसत आहे.
यावर तातडीने उपाययोजना म्हणून कर्जत पोलीस ठाणे यांनी मुख्य भाग असलेल्या कर्जत रेल्वे स्थानकाच्या बाहेरील खूप महिने बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे त्वरित लावावेत व नागरिकांची सुरक्षा जोपासावी , अशी मागणी छत्रपती शिवाजी राजे तक्रार निवारण संघटनेने केली आहे . यावर लवकरच उपाययोजना न केल्यास पोलीस अधीक्षक रायगड – अलिबाग यांच्याकडे पत्रव्यवहार करणार असल्याचे समजते.