if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
कामशेत(प्रतिनिधी) : महर्षी कर्वे आश्रम शाळा कामशेत या आदिवासी आश्रमशाळेत दीपोत्सव व किल्ले बनवा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
सदर कार्यक्रमास लायन्स क्लब ऑफ लोणावळा डायमंड चे अध्यक्ष अनंता गायकवाड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच लायन्स अनंता पाडाळे , लायन्स सुनिता गायकवाड , आश्रमशाळा समिती सदस्य धनंजय वाडेकर , विक्रम बाफना , युवराज शिंदे , शाळेच्या प्राथमिक मुख्याध्यापिका श्रीमती अनिता देवरे , माध्यमिक प्रभारी मुख्याध्यापक तुकाराम पवार , सचिन शेडगे , गणेश हजारे , मनीष कुंभार , डॉ सचिन नागोत्रा, ग्रामीण भागात काम करणाऱ्या वनस्थळी महिला ग्रुप च्या कार्यकर्त्या आदी कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठा सहभाग घेऊन किल्ले शिवनेरी , किल्ले पुरंदर , किल्ले सिंहगड , किल्ले राजगड या आदी किल्ले बनवले तर या किल्ल्यांचे परीक्षण सचिन शेडगे , गणेश हजारे , मनीष कुंभार , डॉक्टर सचिन नागोत्रा यांनी केले.
तदनंतर मुख्य कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली . प्रथमत : प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भारत माता , महर्षी धोंडो केशव कर्वे ( अण्णा ) बाया कर्वे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत दीप प्रज्वलन करण्यात आले . आश्रमशाळा वस्तीगृह परिसरात सुबक रांगोळ्या काढून तसेच हजारो दिवे लावून आश्रमशाळेचा परिसर लख्ख दिव्यांनी उजळून निघाला होता.
प्रमुख पाहुण्यांनी आश्रम शाळेतील विद्यार्थी तसेच शाळेचे कौतुक केले . इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित पोवाडा गायन केले . तसेच विद्यार्थ्यांनी बनवलेले किल्ले यांचे परीक्षण करत असताना परीक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तरे व किल्ला बनवत असताना तुम्हाला आलेले अनुभव व अडचणी तुम्ही कशा सोडवल्या तसेच किल्ल्यांची माहिती विद्यार्थ्यांना विचारण्यात आली.
विद्यार्थ्यांनी अतिशय कुशलतेने आपण बनवलेल्या किल्ल्यांचे अनुभव परीक्षकांसमोर कथन करण्यात केले . किल्ले बनवताना सर्व शिक्षकांनी आम्हाला मार्गदर्शन केले . अशी समर्पक उत्तरे विद्यार्थ्यांनी परीक्षकांना दिली . त्यामुळे परीक्षक देखील भारावून गेले होते . आश्रम शाळेतील शिक्षक वृंद व कर्मचारी वृंद,तसेच आश्रम शाळेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी सदर कार्यक्रमास उपस्थित होते .