खालापूर (दत्तात्रय शेडगे) खालापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणाथ जमीन ही सुपिक असल्याने यासाठी मोठ्या प्रमाणावर भातशेती पिकवली जात असते, परंतु यावर्षी येथील शेतकरी पूर्णपणे संकटात सापडला असल्याचे पाहायला मिळत असताना पहिल्या पावसात भात बी वाहून गेल्याने शेतकऱ्यांनी दुबार भात पेरणी केल्यानंतर काही दिवस पाऊस समाधानकारक पडल्याने भाताचे शिवार बहरले असताना मध्यंतरी पाऊस गायब झाल्याने भाताचे शिवार पाण्याविना कोरडे पडले असताना पुन्हा पाऊस समाधान कारक पडल्याने भात लागवड करण्यात आली.
मात्र गेल्या पाच – सहा दिवसापासून अतिवृष्टीच्या पावसाने अनेकांना झोडपून काढल्याने याचा फटका भातशेतीला बसल्याने अनेक शेतकऱ्यांचे भाताची रोपे पुराच्या पाण्यात वाहून गेली तर अनेकांनी अतिप्रमाणात पडलेल्या पावसाने भातरोपे कुजल्याने शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.खालापूर तालुक्यात औद्योगिक नगरी मोठ्या प्रमाणावर असली तरी भातशेती पिकावर बहुतांशी शेतकरी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असून येथील शेतकऱ्यांना शेती व्यवसाय करताना अनेक समस्यांचा तोंड द्यावे लागत असल्याचे अनेकदा पाहायला मिळत असताना.
यावर्षी शेतकऱ्यांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावा लागला असता यामध्ये बहुतांशी शेतकऱ्यांनी दुबारी केली, परंतु दुबार पेरणीनंतर काही दिवस चांगल्या पध्दतीने पाऊस पडल्याने भाताचे शिवार बहरले होते. मात्र काही पाऊस गायब झाल्याने भाताचे शिवार पाण्याविना कोरडे पडले असताना काही दिवस समाधानकारक पाऊस पडल्याने सर्व शेतकऱ्यांनी भात लागवड केल्याने शेतकरी काही दिवस आनंद होता.
परंतु गेल्या चार – पाच दिवसापासून खालापूराला अतिवृष्टीच्या पावसाने झोडपून काढल्याने याचा फटका शेती व्यवसायाला बसला असून या अतिवृष्टीच्या पावसात भाताची रोपे पुराच्या पाण्यात वाहून गेली तर अनेकांनी अतिप्रमाणात पडलेल्या पावसाने भातरोपे कुजल्याने शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.तर या सर्व शेती नुकसानीची पंचनामे करीत शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी सध्या जोर धरत आहे.
प्रतिक्रिया-
अतिवृष्टी पावसाने आमच्या भाताच्या रोपाची पूर्ण दुर्दशा केल्याने पुराच्या पाण्यात भातरोपे वाहून गेली आहेत, तर काही प्रमाणात रोपे अति पाण्याने कुजल्याने यावर्षी मेहनत पूर्णपणे वाया गेली असून यावर्षी मोठा आर्थिक भुदंड सोसावा लागेल. त्यामुळे शासनाने नुकसानीचे पंचनामे करीत शेतकरी वर्गाला मदत करावी, जेणेकरून शेती व्यवसाय करण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळेल.
दत्तात्रेय दिसले शेतकरी –