Thursday, December 5, 2024
Homeपुणेमावळघोराडेश्वर येथे दरीत पडून तरुणाचा मृत्यू…

घोराडेश्वर येथे दरीत पडून तरुणाचा मृत्यू…

मावळ (प्रतिनिधी): तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. तळेगाव दाभाडे जवळ असलेल्या श्री क्षेत्र घोराडेश्वर इथे दरीत कोसळून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. घोराडेश्वर डोंगरावर असलेल्या श्री शंकराच्या मंदिराजवळील दरीत कोसळून सदर 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, तळेगाव दाभाडेजवळ असेलल्या घोराडेश्वर मंदिर येथे दररोज अनेक पर्यटक भेट देत असतात. तसेच अनेक स्थानिक नागरिक नियमितप्रमाणे डोंगरावर चढण-उतरण करत असतात. तळेगाव दाभाडे येथीलच रहिवासी असलेला लक्ष्मण जटप्पा पुजारी (वय 25 वर्षे, रा. तळेगाव दाभाडे, म्हाडा कॉलनी) हा तरुण घोराडेश्वर डोंगरावर गेला असता शंकर मंदिर जवळील दीडशे फुट खोल दरीत कोसळला. यात तो गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला.
वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सदस्यांनी त्याचा मृतदेह शोधण्यात मदत केली. यावेळी तळेगाव दाभाडे पोलिस एपीआय राहुल साळी आणि अन्य सहकारी उपस्थित होते. महेश मसने, सागर कुंभार, राजेंद्र कडु, अमोल सुतार, हर्ष तोंडे, अशोक उंबरे, हर्षल चौधरी, रतन सिंग, कमल परदेशी, अनिल आंद्रे, भास्कर माळी, सत्यम सांवत, विकी दौंडकर, सुनिल गायकवाड आणि निलेश संपतराव गराडे यांनी मृतदेह शोधण्यात आणि दरीतून वर काढण्यात मदत केली. तर राणी एम्बुलन्सचे अजय मुर्हे यांनी एम्बुलन्स सेवा दिली.
- Advertisment -

You cannot copy content of this page