सागरशेठ शेळके – सचिन गायकवाड – जयेश ठोंबरे यांचा पुढाकार..
भिसेगाव-कर्जत(सुभाष सोनावणे)राजकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे व गोर – गरीब जनतेच्या अडीअडचणीच्या कामात मदतीचा हात पुढे करून सहकार्य करणारे कर्जत तालुक्यातील डिकसल येथील ” शिवशाही युवा प्रतिष्ठान ” चे अध्यक्ष सागरशेठ शेळके “ऑक्सीजन ऑनलाईन सर्व्हिसेस ” चे मालक सचिन गायकवाड व ” जयेश ठोंबरे अँड असोसिएट ” चे जयेश ठोंबरे यांच्या माध्यमातून मोफत आधार कार्ड बनवायचे व दुरुस्तीचे शिबिर दिनांक २५ व २६ डिसेंबर २०२१ रोजी आयोजित करण्यात आले होते.
सदर शिबिराला नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद देत आधार कार्ड बनवून व दुरुस्ती करून घेतली.या दोन दिवसीय आधार कार्ड शिबिरात जवळपास ४०० नागरिकांनी व महिलांची नावे नोंद झाली होती परंतु आधार कार्ड ची एकच मशीन असल्याने फक्त १२५ लोकांचे आधार दुरुस्तीचे काम पूर्ण होऊ शकले.सदर शिबिराला आधार सेवा केंद्र चालक सुनील म्हसे सर, तुषार म्हसे तसेच योगेश कांबरी सर यांनी विशेष सहकार्य केले.
तसेच प्रत्येक आठवड्याच्या शनिवार – रविवारी ऑक्सीजन ऑनलाईन सर्व्हिसेस-डिकसल येथे आधार कार्ड सेवा केंद्र चालू राहील , म्हणून जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा , असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक कर्जत तालुका अध्यक्ष सागरशेठ शेळके यांनी केले आहे.तर डिकसळ सारख्या ग्रामीण भागात आधार कार्ड सेवा केंद्र चालू केल्याने परिसरातील नागरिकांना येणाऱ्या अडचणीत चांगलेच सहकार्य केल्याबद्दल ” शिवशाही युवा प्रतिष्ठान ” चे अध्यक्ष सागरशेठ शेळके “ऑक्सीजन ऑनलाईन सर्व्हिसेस ” चे मालक सचिन गायकवाड व ” जयेश ठोंबरे अँड असोसिएट ” चे जयेश ठोंबरे यांचे परिसरातील नागरिकांनी व महिला वर्गांनी आभार व्यक्त केले .