if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
मावळ (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा “मन की बात” कार्यक्रम खडकाळे (कामशेत) येथे आज संपन्न झाला . या कार्यक्रमासाठी मावळातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामशेत येथून “मन की बात “या कार्यक्रमात उपस्थिती दर्शविली.
मन की बात कार्यक्रमात मोदींनी विविध महत्वपूर्ण विषयांवर भाष्य केले . सर्वप्रथम त्यांनी छठ सणानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या . पीएम मोदींनी किसान कुसुम योजना , सौरऊर्जा आणि अंतराळ क्षेत्रातील भारताचे यश यावरही त्यांनी भाष्य केले . मन की बात कार्यक्रमात पीएम मोदींनी गुजरातमधील मोढेरा गावाचे उदाहरण दिले . भारताच्या अंतराळ क्षेत्रातील कामगिरीबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले की , इस्रोने नवीनतम प्रक्षेपणांसह भारताला जागतिक व्यावसायिक बाजारपेठेत एक मजबूत खेळाडू बनवले आहे . त्याचप्रमाणे अंतराळ क्षेत्रातील भारताच्या कामगिरीचे कौतुक केले . एक काळ असा होता की भारताला क्रायोजेनिक तंत्रज्ञान नाकारण्यात आले होते . पण भारताने हे काम स्वतः केले आणि आज तो स्वतःच्या तंत्रज्ञानाने उपग्रह प्रक्षेपित करत आहे .
सौरऊर्जेवरील भारताच्या यशाचीही गणना केली.पंतप्रधान म्हणाले की , संपूर्ण जग सौरऊर्जेकडे आपले भविष्य पाहत आहे . आम्ही आमच्या शेतकरी बांधवांसाठी किसान कुसुम योजना सुरू केली . ज्या अंतर्गत शेतकरी सौर पंप बसवत आहेत . आता शेतकरीही सौरऊर्जेतून कमाई करत आहेत . तमिळनाडूतील कांचीपुरम येथील एका शेतकऱ्याचाही त्यांनी उल्लेख केला . ज्याने आपल्या शेतात दहा अश्वशक्तीचा सौर पंप संच बसवला आहे. तसेच डिजीटल भारत अग्रस्थानी असून याचा देशाला खुप फायदा झाला असल्याचे ते म्हणाले तसेच युवा शक्तीचा विशेष उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमात केला.
या वेळी खडकाळे (कामशेत) येथे कार्यक्रमासाठी मावळ तालुकाध्यक्ष रविंद्रआप्पा भेगडे ,जेष्ठ नेते माऊलीमामा शिंदे, मा.सभापती राजाराम आप्पा शिंदे,पु.जि.यु.आर. पी. आय. अध्यक्ष समीर जाधव,विजय शिंदे, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे,उद्योजक विश्वनाथ नाणेकर, उपाध्यक्ष मोहन वाघमारे, संघटनमंत्री दत्तात्रय खेंगले,गण अध्यक्ष अरूण कुटे,शासकीय संयोजक रवि आंद्रे,कामशेत भाजपा शहर अध्यक्ष प्रविण शिंदे, उपाध्यक्ष रमेश बच्चे,संजय बिनगुडे, मा.उपसरपंच नितिन गायखे,भरत रानवडे,आंदर मावळ विद्यार्थी आघाडी अध्यक्ष विठ्ठल तुर्डे,विठ्ठल काळोखे,बुथ अध्यक्ष पवार ,बाळासाहेब लालगुडे,बबलु सुर्वे,जितेंद्र तेजिरा,हरिभाऊ पवार तसेच स्थानिक ग्रामस्थ,पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.