(खोपोली- दत्तात्रय शेडगे)
रायगड पशुचिकिस्ता व्यवसाय संघटना खालापूर यांच्या वतीने कामबंद आंदोलन करून विविध मागण्याचे खालापूरचे गटविकास अधिकारी संजय भोये यांना निवेदन देण्यात आले.यामध्ये पहिल्या टप्प्यातले लसीकरण बंद करण्यात आले.
असून ऑनलाइन मासिक व वार्षिक न अहवाल देणे, आढावा बैठकीस उपस्थित न राहणे, सर्व शासकीय व्हाट्सअप ग्रुप मधून बाहेर पडणे, या स्वरूपाचे आंदोलन करण्यात आले हे आंदोलन 16 जून रोजी करून गटविकास अधिकारी संजय भोये यांना देण्यात आले.
याची प्रशासनाने या निवेदनाची दखल घेतली नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडन्यात येईल असा इशारा पशुचिकिस्ता व्यवसायी संघटनेचे खालापूर तालुकाध्यक्ष डॉ राजेंद्र गायकवाड यांनी दिला आहे.यावेळी डॉ पशुचिकिस्ता व्यवसायी संघटनेचे खालापूर तालुका अध्यक्ष राजेंद्र गायकवाड, डॉ दीपाली, डॉ महापेनकेर, आदी उपस्थित होते.