Friday, July 4, 2025
Homeपुणेलोणावळाबोरघाटात केमिकल टँकर उलटल्याने महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा...

बोरघाटात केमिकल टँकर उलटल्याने महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा…

लोणावळा : पुणे मुंबई एक्स्प्रेस मार्गावर खंडाळा बोरघाटात जुन्या अमृतांजन पुलाच्या पुढील वळणावर एक केमिकल टँकर पलटी झाल्याने एक्सप्रेस हायवेवर वाहतूक ठप्प झाली असून दुतर्फा वाहनांच्या पाच ते सहा किलोमिटर रांगा लागलेल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर केमिकल टँकर पलटी झाल्याने टँकर मधील सर्व केमिकल रस्त्यावर सांडले आहे . त्यामुळे पुण्याहून मुंबई कडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प पडली असून याचा परिणाम मुंबई हुन पुण्याकडे येणाऱ्या वाहतुकीवरही झाला आहे , त्या लेनवरही वाहतूक खोळंबली आहे.

एक्सप्रेस हायवे बंद झाल्याने वाहने जुन्या महामार्गाने वळविण्यात आल्याने लोणावळा शहारात देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून संपूर्ण रस्ता वाहतुकीसाठी ठप्प झाला आहे .पलटी झालेला टँकर तसेच रस्त्यावर सांडलेले केमिकल काढण्यासाठी महामार्ग पोलीस , आयआरबी आणि देवदूत हे प्रयत्न करीत असून पुढील काही वेळेतच रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत करण्यात येईल अशी माहिती महामार्ग पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page