
लोणावळा : भारतीय जनता पार्टीच्या मावळ तालुका अल्पसंख्याक आघाडी अध्यक्ष पदी खंडाळा येथील शौकत शेख तर भारतीय जनता पार्टी मावळ तालुका चित्रपट सांस्कृतिक अध्यक्षपदी विद्यासागर वैजनाथ बेलोरे यांची नियुक्ती करण्यात आली.
मावळ तालुका भाजपाचे अध्यक्ष रविंद्र भेगडे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तिपत्र देण्यात आले . शौकत शेख हे मागील अनेक वर्षापासून नितेश राणे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखे जातात.स्वाभिमान या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी लोणावळा व खंडाळा परिसरात युवकांचे मोठे संघटन तयार केले आहे . नारायण राणे , नितेश राणे , निलेश राणे यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर शौकत शेख यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह भाजपा मध्ये प्रवेश केला होता.मागील काही वर्ष ते भाजपात कार्यरत आहेत.
त्यांच्या संघटन कौशल्याचा भाजपा पक्षाला मावळ तालुक्यात फायदा व्हावा व पक्ष संघटना बळकट व्हावी याकरिता शौकत शेख यांच्यावर मावळ तालुका अल्पसंख्याक आघाडीची जबाबदारी देण्यात आली आहे .तसेच विद्यासागर यांनी ही बरेच वर्ष प्रयत्नशील भाजपा कार्यकर्ता म्हणून कार्य केले आहे. त्यांच्या एवढ्या वर्षाच्या कार्याची दखल घेत त्यांच्यावर चित्रपट सांस्कृतिक आघाडी मावळ तालुकाध्यक्ष पदाची जबबाबदारी सोपविण्यात आली आहे.