लोणावळा दि.22 : महाराष्ट्र पोलीस राज्य उत्पादन शुल्क , दुय्यम निरीक्षक दिक्षांत संचलन सोहळा 2022 पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा येथे संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख उपस्थित उत्पादन शुल्क पुणे विभाग ,जिल्हा उप आयुक्त प्रसाद सुर्वे यांच्या आगमनाने व त्यांच्या हस्ते ध्वजा रोहण आणि मानवंदना करून करण्यात आली.
यावेळी उप आयुक्त प्रसाद सुर्वे यांच्या प्रमुख उपस्थितीत लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाटील, लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सोमनाथ जाधव, लोणावळा शहर पोलीस निरीक्षक सिताराम डुबल तसेच पोलीस अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
उपस्थित अतिथीच्या हस्ते ‘ स्वयंस्फूर्ती ‘ या मासिकाचे अनावरण करून अतिथी मार्फत परेड निरीक्षण करण्यात आले.
आज आयोजित केलेल्या दीक्षांत संचलन सोहळ्यात राज्य उत्पादक शुल्क, दुय्यम निरीक्षक 2022 उत्कृष्ट प्रशिक्षनार्थी यांना पारितोषिके देण्यात आली ती पुढील प्रमाणे- कृष्णा नीळकंठ देवरे, PTC क्र.7, गडचिरोली यांना बाह्य वर्ग प्रथम व गोळीबारात प्रथम असे दोन पारितोषिक देण्यात आले, तर आंतरवर्ग प्रथम हे पारितोषिक प्रदीप दत्तात्रय झुंजरुक ( अहमदनगर ) यांना मिळाले,तसेच अष्ट पैलू प्रथम हे पारितोषिक प्रदीप दत्तात्रय झुंजरूक ( अहमदनगर ) व धनश्री प्रकाश शिंदे ( पुणे ) यांना विभागून देण्यात आले आहे.
त्याचबरोबर युवराज शिवाजी शिंदे ( सोलापूर ) यांनी अष्ट पैलु द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविले तर अष्ट पेलु तृतीय क्रमांकाचे पारितोषिक चेतन रमेशराव शिंदे (नाशिक ) व सृष्टी दिलीप भागवत ( पुणे ) यांना विभागून देण्यात आले आहे. तसेच सर्व पारितोषिक विजेत्या प्रशिक्षणार्थिंना उपस्थित अतिथीच्या हस्ते स्वागत व शुभेच्छा देण्यात आल्या.
त्याचबरोबर उप आयुक्त प्रसाद सुर्वे यांनी सर्व प्रशिक्षणार्थी यांना एक निष्ठेने कर्तव्य बजावण्यावर मार्गदर्शन करून स्मृती चिन्ह प्रदान करण्यात आले.