वडगांव मावळ(प्रतिनिधी): उच्चवर्णीय शिक्षकाच्या पाण्याच्या माठातुन दलित विद्यार्थी पाणी प्यायला म्हणून राजस्थानच्या इंद्रकुमार मेघवाल या 9 वर्षीय विद्यार्थ्याला जातीयवादी शिक्षकाने क्रूररीत्या ठार मारले तसेच कोथुर्णेगावची कन्या स्वरा चांदेकर ह्या 7 वर्षीय बालिकेवर अमानुष पाशवी बलात्कार करुण ठार मारण्यात आले . या दोन्ही प्रकरणी आरोपींना फाशी देण्यासाठी वडगावमध्ये आंबेडकरी समाजाच्या वतीने निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला होता.
समस्त आंबेडकरी समाज मावळच्या वतीने आयोजित विविध आंबेडकरी पक्ष , संघटना व संस्थाचे नेते व पदाधिकारी यांनी उत्सफुर्त सहभाग घेतला . स्वराला न्याय मिळालाच पाहिजे , ईंद्रकुमार मेघवालला न्याय मिळालाच पाहिजे , जातीयवाद मुर्दाबाद , धर्मवाद मुर्दाबाद व संविधान झिंदाबाद या घोषणांनी वडगाव दणाणून गेले . भारताचा 75 वा स्वातंत्र्य महोत्सव साजरा होत असताना या देशामध्ये शाळेमधील विद्यार्थी सुरक्षित नाही तसेच घरामधील बालिका महिला सुरक्षित नाहीत . स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणायचा की मृत महोत्सव म्हणायचा असा प्रश्न विचारत भारताच्या राष्ट्रध्वजाखाली भारतीय नागरीक म्हणून आंबेडकरी समाजाने हा जाब विचारून ह्या दोन्ही प्रकरणातील आरोपींना फाशी देण्याची मागणी केली आहे.
आजही देशात पिण्याचे पाणी प्राशन केल्यास अपराध मानूण जर त्यांना ठार मारण्यात येत असेल तर देशात संविधानानुसार कारभार चालत नसुन देशात मनुवादि व्यवस्था कार्यरत असूनधर्मवादी व्यवस्थेच्या विरोधात समतेसाठी तसेच महीला , बालके नागरीकांच्या सुरक्षिततेसाठी आंबेडकरी समाज सातत्याने संघर्षरत राहील असा इशारा आंबेडकरी नेत्यांनी व्यक्त केला . या प्रसंगी दादासाहेब यादव , शिवराम कांबळे ,, प्रकाश बी . गायकवाड , सुभाष गायकवाड , कोंडीभाऊ रोकडे , मधुकर भालेराव , समाधान सोनावणे , कुणाल घोडके , निलेश गायकवाड , बालकृष्ण टपाले , प्रा . जिभाऊ बच्छावसर , सिचन भवार यांनी मोर्चाला संबोधित केले.
या प्रसंगी निवेदणावर उपस्थितांच्या स्वाक्षऱ्या घेऊन सदर निवेदन सामुदायिकरित्या तहसिलदारांना सुपुर्द करण्यात आले . निषेध मोर्चा यशस्वी करण्यासाठी मनिषा गोतारणे , अर्चना वाघमारे , अंकुश चव्हाण , अजय भवार , चंद्रकांत ओव्हाळ , सचिन कांबळे , विपुल जाधव , रुषिकेश भोसले , संदिप ओव्हाळ , संदिप कदम , राहुल जाधव , प्रविण सरोदे , दिपक गायकवाड , दिलिप देसाई , सचिन ओव्हाळ , अविनाश लोखंडे , शशिकांत शिंदे , महेंद्र साळवे , योगेश शिंदे व दिनेश गमरे यांनी विशेष परिश्रम घेतले.