लोणावळा (प्रतिनिधी) : लोणावळा नगरपरिषद कर्मचारी गणेशोत्सव मंडळांच्या गणपती मूर्तीचे अगदी भावपुर्ण वातावरणात व आनंदात विसर्जन करण्यात आले.
स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत यावेळी गणेश विसर्जन मिरवणूकीत वृक्षदिंडी काढण्यात आली. लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंडित पाटील यांनी वृक्षदिंडी घेवून सुरुवात केली नंतर भक्तीच्या मार्गाने टाळांच्या व भजनाच्या गजरात लक्षनीय मिरवणूक काढण्यात आली.मिरवणुकीचे मुख्य आकर्षण म्हणजे यावेळी मिरवणुकीतून प्लास्टिक बंदी व वृक्ष लावा वृक्ष जगवा याबाबत जनजागृती करण्यात आली.
त्यानंतर नगरपरिषदेने केलेल्या कृत्रिम तलावात गणेशाचे विसर्जन करण्यात आले. या प्रसंगी नगरपरिषदेचे सर्व अधिकारी कर्मचारी यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. लोणावळा नगरपरिषद कर्मचारी व नागरिक मोठया संख्येने सहभागी झाले होते. तसेच यावर्षीचे गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले.