Tuesday, December 3, 2024
Homeपुणेलोणावळालोणावळा हनुमान टेकडी येथून 12 वर्षीय मुलगा बेपत्ता..

लोणावळा हनुमान टेकडी येथून 12 वर्षीय मुलगा बेपत्ता..

लोणावळा दि.28 : लोणावळा शहर पोलीस स्टेशन हद्दीतील हनुमान टेकडी येथील 12 वर्षीय बेपत्ता बालकाचे अपहरण झाल्याची तक्रार लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल.

तुषार सुनील भालेराव ( वय 12, रा. पत्रा चाळ, हनुमान टेकडी लोणावळा ) असे बेपत्ता झालेल्या मुलाचे नाव आहे.

याबाबत मुलाची आजी शोभा अशोक भालेराव ( वय 45, रा. पत्राचाळ, हनुमान टेकडी, व्यवसाय मजुरी ) यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी नुसार तुषार हा दुपारी 12 वाजन्याच्या सुमारास जेवण करुन झाल्यावर बाथरुमला जावुन येतो असे सांगुन घरातुन निघुन गेला आहे.

म्हणुन फिर्यादी शोभा भालेराव यांनी तिच्या नातुस कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी फुस लावुन पळवून नेले असल्याची फिर्याद दाखल केली आहे.

सदर फिर्यादीवरुन लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजि क्र.03/2022 भा द वी कलम 363 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बेपत्ता झालेल्या बालकाचे वर्णन पुढील प्रमाणे आहे नाव: तुषार सुनिल भालेराव (वय 12 ) भाषा मराठी,बांधा सडपातळ , रंग निमगोरा , उंची 3 फुट 8 इंच , चेहरा उभट केस मध्यम काळे असे वर्णन असून त्याने अंगावर तपकरी रंगाचा चौकटीचा शर्ट व काळ्या रंगाची हाफ पॅन्ट असे कपडे परिधान केले आहे.

तरी याबाबत कोणाला काहीही माहीती मिळाल्यास लोणावळा शहर पोलीस स्टेशन – 02114273033 तसेच पोसई मुजावर मोबाईल क्र.9022081981 व पोना अजीज मेस्त्री मोबाईल क्र. 8237712626 यावर संपर्क साधण्याचे आवाहन लोणावळा शहर पोलीस स्टेशन कडून करण्यात आले आहे.

पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस नाईक अजीज मेस्त्री करत आहेत.

- Advertisment -

You cannot copy content of this page