लोणावळा : लोणावळा नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव आणि माजी नगरसेवक श्रीधर पुजारी हे दर सोमवारी लोणावळा नगरपरिषद कार्यालयात येऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर निवारण करणार आहेत.
लोणावळा नगरपरिषदेची मुदत संपल्यानंतर शहरात प्रशासक नियुक्त करण्यात आले आहे . प्रशासक नियुक्त झाल्यानंतर लोणावळा शहरात नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत अशी माहिती श्रीधर पुजारी यांनी दिली.
पिण्याचे पाणी , स्वच्छता याबाबतच्या तक्रारी प्रशासनाकडून सोडवील्या जात नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत . नागरिकांच्या सर्व समस्या सोडविण्याकरिता आज सोमवार पासून सुरुवात करण्यात आली असून यावेळी प्रशासकीय तक्रारी घेऊन अनेक नागरिकांनी येऊन आपापल्या तक्रारी दाखल केल्या.दाखल तक्रारिंवर कसे निवारण करता येईल नागरिकांचे प्रश्न कसे सोडवता येईल यासाठी सुरेखा जाधव आणि श्रीधर पुजारी यांच्यासह भाजपाचे माजी लोकप्रतिनिधी व पदाधिकारी प्रयत्न करणार आहेत.
अशा प्रकारच्या ज्या नागरिकांच्या समस्या असतील त्यांनी नगर परिषदेमध्ये येऊन भाजपा पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन जाधव व पुजारी यांनी केले आहे .