लोणावळा (प्रतिनिधी):लोणावळा शहरात “आनंद नगरी उत्सव मेला आयोजित करण्यात आला आहे.दि.10 नोव्हेंबर पासून पुरंदरे ग्राउंड लोणावळा या ठिकाणी हा महा उत्सव सुरु करण्यात आला असून मावळ करांना याचा सहज आनंद घेता येणार आहे.
याठिकाणी क्राफ्ट इंडिया शॉपिंग फेस्टिवल 2022 चे आयोजन करण्यात आले असून या महाउत्सवात भारतातील 10 हजार प्रकारच्या विविध वस्तू पाहायला व खरेदी करता येणार तेही स्वस्त दरात.या महाउत्सवाचे आयोजन आनंद नगरी उत्सव मेला यांच्या वतीने करण्यात आले असून याचा शुभारंभ माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी व माजी नगरसेवक प्रकाश काळे यांच्या शुभहस्ते दि.10 नोव्हेंबर रोजी करण्यात आले. हा भव्य दिव्य मेला एक महिना म्हणजेच 11 डिसेंबर पर्यंत असणार असल्याची माहिती आनंद नागरी उत्सव मेला कमिटीने दिली आहे.
या उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे उंच उंच विद्युत रोषणाईने झगमगणारा भव्य दिव्य आकाश पाळणा, सुपर ड्राइगन ट्रेन, लहानांसाठी ट्रेन व इतर खेळणे आहेत. तसेच मनोरंजनासाठी विविध प्रकारच्या गेम्स त्यावर आकर्षक भेट वस्तू ठेवण्यात आल्या आहेत.
त्याचबरोबर शॉपिंग फेस्टिवल मध्ये विविध प्रकारचे फॅन्सी पुरुष व महिलांचे कपडे,बूट चपला,विविध प्रकारचे घरगुती साहित्य, लाकडापासून तयार केलेल्या आकर्षक डिझाईंचे शो पीस, विविध बनावटीचे लोणचे व फरसाण लहानांसाठी खेळणी तरुणांसाठी क्रिकेटच्या आकर्षक बॅट अशा प्रकारे अनेक प्रकारच्या वस्तू पाहायला व खरेदी करण्यासाठी भेटणार असल्यामुळे याठिकाणी मनोरंजन व खरेदीसाठी परिसरातील नागरिक व लहान मुले, महिला मोठया प्रमाणात या महाउत्सवाचा आनंद घेत जत्रा भरल्याप्रमाणे गर्दी करत आहेत.