Tuesday, May 21, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडवंचित बहुजन आघाडीच्या मावळ मतदार संघाच्या उमेदवार " सौ.माधवीताई नरेश जोशी "...

वंचित बहुजन आघाडीच्या मावळ मतदार संघाच्या उमेदवार ” सौ.माधवीताई नरेश जोशी ” यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन !

गोर गरिबांची माऊली – अनाथांची सावली ” प्रतिस्पर्ध्यांना ” तगडे आव्हान…

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) मावळ लोकसभा मतदार संघात ” वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार सौ. माधवी ताई नरेश जोशी ” यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करून आपला उमेदवारी अर्ज भरला आहे . त्यांच्या उमेदवारीने या मतदार संघात प्रतिस्पर्धी उमेदवारांना एक महिला उमेदवार म्हणून तगडे आव्हान असणार आहे . गेली २ वर्षे त्यांनी केलेली समाजकार्य , दीन दुबल्यांना केलेली मदत , सामाजिक – शैक्षणिक – धार्मिक – सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचे भरीव कार्य या निवडणुकीत कामी येवून त्यांचा विजय मोठ्या मताधिक्याने होणार , अशीच चर्चा या मतदार संघात होत आहे .
सौ. माधवी ताई नरेश जोशी यांना वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून पक्षाचे सर्वेसर्वा ” श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर ” यांनी पक्ष प्रवेश करून त्यांना मावळ लोकसभा मतदार संघातून उमेदवारी दिली आहे .
मावळ मतदार संघात येणारे कर्जत – खालापूर , पनवेल , उरण , मावळ , पिंपरी , चिंचवड या सहा विधानसभा मतदार संघात वंचित बहुजन आघाडी व मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी आहेत , तसेच या सर्व मतदार संघात माधवी ताई जोशी यांचे प्रचंड जनसंपर्क व मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्य आहे . त्यातच त्या एक महिला उमेदवार असल्याने महिलांचे प्रश्न , सुरक्षा , अन्याय अत्याचार , रोजगार , याविरोधात संविधानाच्या माध्यमातून त्या योग्य लक्ष देवून सोडवू शकतात , असा विश्वास येथील महिला मतदारांना असल्याने हि देखील त्यांच्या विजयाची जमेची बाजू आहे.

मावळ लोकसभा मतदार संघ अस्तित्वात आल्यापासून या मतदार संघात पाहिजे तसा विकास झाला नसल्याची ओरड सौ. माधवी ताई नरेश जोशी यांनी ” भावी खासदार ” म्हणून या मतदार संघात सामाजिक कार्य करण्यास सुरुवात केल्यापासून केलेली आहे . म्हणूनच गरजवंताना त्यांनी मोठ्या प्रमाणात कला – क्रिडा – शैक्षणिक – सांस्कृतिक – धार्मिक – या क्षेत्रात केलेली मदत जे आजपर्यंत खासदारकी भोगणारे व इतर राजकीय पक्षांनी केली नाही ती त्यांनी करून दाखविली आहे . एक विश्वसनीय व्यक्तिमत्त्व , नेहमी समाज सेवेचा निर्मळ ध्यास मनी घेऊन माधवी ताई जनतेला आपलस करत आहेत , या प्रस्थापितांच्या लढाईत नक्कीच त्यांच्या प्रयत्नांना यश मिळेल , व त्या खासदार म्हणून संसदेत निवडून जातील , हेच चित्र त्यांच्या आजपर्यंतच्या वास्तवा वरून दिसत आहे.
त्यांनी केलेले शक्ती प्रदर्शन प्रतिस्पर्धी उमेदवारांना हादरा देणारे ठरले आहे . गुलाल माझ्याच अंगावर उडणार , वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी , कार्यकर्ते , श्रद्धेय आंबेडकरी घराण्याने माझ्यावर टाकलेला विश्वास नक्कीच सार्थकी ठरवतील , व विजय आपलाच होईल , असे मत वंचित च्या उमेदवार सौ. माधवी ताई नरेश जोशी यांनी व्यक्त केले.
- Advertisment -

You cannot copy content of this page