Friday, November 22, 2024
Homeपुणेमावळवाकसई येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त दिवंगत सुरेश देसाई यांच्या स्मरणार्थ...

वाकसई येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त दिवंगत सुरेश देसाई यांच्या स्मरणार्थ वाकसई येथे ग्रंथालयाचे लोकार्पण…

वाकसई (प्रतिनिधी): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती वाकसई भीम नगर येथे मोठया उत्साहात पार पडली. येथील जनसेवा तरुण मंडळाच्या वतीने या जयंती सोहळ्याचे दोन दिवसीय आयोजन करण्यात आले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती चे औचित्य साधून वाकसई ग्रामपंचायत सदस्या पुष्पाताई सुरेश देसाई यांच्या माध्यमातून दिवंगत सुरेश गोविंद देसाई यांच्या स्मरणार्थ भीम नगर येथील बुद्ध विहारात ग्रंथालयाचे लोकार्पण करण्यात आले त्यामुळे नवीन पिढीला वाचनाची आवड निर्माण होऊन बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे विविध ग्रंथ नवीन पिढीला वाचायला मिळतील असे मत यावेळी पुष्पाताई यांनी व्यक्त केले.तसेच यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांच्या नवीन प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
तसेच 14 एप्रिल रोजी बँड पथकाच्या गजरात फटाख्याची आतिषबाजी करत मिरवणूक काढून लोणावळ्यातील सर्व महात्म्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्या पुष्पाताई देसाई,जेष्ठ कार्यकर्ते अरुण देसाई,युवा कार्यकर्ते प्रतीक देसाई, जेष्ठ कार्यकर्ते बाळू देसाई,जेष्ठ कार्यकर्ते नारायण गायकवाड,अनिल देसाई,प्रेम देसाई,प्रफुल्ल देसाई,जयदीप मोरे,प्रदीप मोरे, प्रितेश देसाई,रितिक भालेराव, साहील भालेराव,रुपेश भालेराव,नितीन देसाई, निलेश जगताप, सुमित देसाई आणि महिलांमध्ये वत्सला देसाई,मालिता भालेराव, शुभांगी देसाई, विद्या मोरे, सुमन देसाई, रीना देसाई,पुजा देसाई, सुनीता देसाई,हर्षदा देसाई, सोनाली देसाई, ज्योती देसाई, तन्वी देसाई आदी कार्यकर्त्यांसह लहान भीमसैनिक मोठया संख्येने या मिरवणुकीत सहभागी झाले होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page