Tuesday, August 5, 2025
Homeमहाराष्ट्ररायगडवेणगाव ग्रामस्थांचा उपजिल्हाप्रमुख भाई गायकर यांच्या मार्गदर्शनाने व प्रणित घोडके यांच्या...

वेणगाव ग्रामस्थांचा उपजिल्हाप्रमुख भाई गायकर यांच्या मार्गदर्शनाने व प्रणित घोडके यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत पक्षप्रवेश !

आमदार महेंद्रशेठ थोरवे यांची प्रमुख उपस्थिती..

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे )येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच ग्रामपंचायतीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कर्जत – खालापूर मतदार संघाचे ” बाळासाहेबांची शिवसेना ” या पक्षाचे कर्जत – खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ थोरवे एक एक भाग व तेथील कार्यकर्ते आपल्या पक्षात घेऊन पक्ष मजबूत करत सर्वत्र भगवेमय वातावरण निर्माण करत आहेत.त्याचाच एक भाग म्हणजे काल दि.१६ ऑक्टोबर २०२२ रोजी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख भाई गायकर यांच्या मार्गदर्शनाने वेणगाव ग्रामपंचायत हद्दीतील बौद्ध नगर येथील अनेक ग्रामस्थ व महिलांनी युवा नेतृत्व प्रणित पांडुरंग घोडके यांच्या नेतृत्वाखाली आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या कार्य कुशलतेवर विश्वास ठेवून पक्षप्रवेश केला.
यावेळी धैर्य – निष्ठा आणि आदर बाळगून महिलांचा सन्मान केला जाईल व प्रवेश करणाऱ्या सर्व प्रवेशकर्त्यांना शिवसेनेत मानसन्मान दिला जाईल , असा विश्वास आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी व्यक्त करत , सर्वांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला. यावेळी आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या शुभहस्ते सर्वांना भगवी स्कार्फ गळ्यात घालण्यात आली.यावेळी आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या समवेत , उपजिल्हाप्रमुख भाई गायकर , माजी उपसभापती मनोहर दादा थोरवे , वेणगाव ग्रामपंचायतीचे सरपंच अभिषेक गायकर , विधानसभा संघटक पाटील , तसेच शिवसेनेचे अनेक पदाधिकारी , शिवसैनिक तसेच यावेळी ज्यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश झाला ते युवा नेतृत्व प्रणित घोडके सह अनेक वेणगाव येथील महिला , ग्रामस्थ , तरुण वर्ग उपस्थित होते.
या पक्ष प्रवेशामुळे वेणगाव ग्रामपंचायत व पंचायत समिती प्रभागात महेंद्रशेठ थोरवे यांच्या सह शिवसेनेची ताकद वाढल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे .वेणगाव ग्रामपंचायत हद्दीत व पंचायत समिती प्रभागात उपजिल्हाप्रमुख भाई गायकर यांची प्रचंड ताकद आहे.गेली ३० वर्षे ही ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यात आहे .यापूर्वी भाई गायकर यांनी सरपंच पद भूषविले होते , तर आता त्यांचा मुलगा अभिषेक गायकर थेट सरपंच म्हणून निवडून आलेला आहे.त्यामुळे भविष्यात या असंख्य वेणगाव ग्रामस्थ व महिलांनी केलेला पक्षप्रवेशाने शिवसेनेची ताकद वाढली आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page