Friday, November 22, 2024
Homeपुणेवडगावश्री एकविरा कृती समितीचे बेमुदत उपोषण सुरु! शेतकऱ्यांना मिळणार का न्याय ?

श्री एकविरा कृती समितीचे बेमुदत उपोषण सुरु! शेतकऱ्यांना मिळणार का न्याय ?

वडगाव मावळ : श्री एकविरा कृती समिती च्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी वडगाव पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे.

कित्येक वर्षे श्री एकविरा कृती समितीच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत सातत्याने शासन दरबारी मोर्चे , रस्ता रोको आंदोलने करुन निवेदणे देण्यात आली आहेत. त्या सातत्याने देण्यात येणाऱ्या निवेदनाकडे व मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करत असल्यामुळे आज शेतकऱ्यांना उपोषणास बसावे लागत असल्याचे उपोषण कर्त्यांनी सांगितले आहे.

उपोषणातील प्रमुख मागण्या १ ) डोंगरगाव ते पाथरगाव दरम्यान इंद्रायणी पात्र खोल करण्यात यावे,इंद्रायणी पात्र खोल नसल्यामुळे ऑगस्ट महिन्यातील पुरामुळे 30 गावातील शेतीची पिके नष्ट होवून मोठे नुकसान होते, त्यामुळे याभागात शेती पुरक व्यवसाय बागायती शेती करता येत नाही . २ ) इंद्रायणी नदीत वलवण धरणाचे पाणी सोडावे : कारण नदी उथळ असल्याने पुरानंतर पाणी थांबत नाही म्हणुन पाण्या अभावी शेतीपुरक व्यवसाय व बागायती शेती करता येत नाही . त्यामुळे शेतकरी समाज गरीबी , दारिद्रय , शिक्षण , बेरोजगारी ने त्रस्त असून यामुळे हा समाज मागे आहे . ३ ) जलपर्णी , नदीपात्र व ओढ्या लगतची अतिक्रमणे काढणे. इत्यादी प्रमुख मागण्या घेऊन शेतकरी समाज हितासाठी मा. जि. परिषद सदस्य भाई भरत मोरे, मा. सरपंच अरुण भानुसघरे, मा. जि. प. सदस्य मिलिंद बोत्रे, मा. सरपंच विष्णु गायखे मा. सरपंच नंदकुमार पदमुले, मा. सरपंच गुलाब तिकोणे, मा. सरपंच काळुराम थोरवे, मा. सरपंच सुनिल गुजर,शरद हुलावळे अन्य उपोषणकर्त्यांच्या उपस्थितीत या उपोषणाला सुरुवात करण्यात आली असून.

यासाठी शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागावे म्हणून मावळातून मा. पं. स. सदस्य दिपकशेठ हुलावळे, वाकसई माजी सरपंच भरतशेठ येवले, मा. सरपंच तानाजी पडवळ,सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब नाणेकर, सरपंच महेंद्र आंबेकर, मा. सभापती शरदराव हुलावळे, मा. चेअरमन बाळासाहेब भानुसघरे, उपसरपंच किरणशेठ हुलावळे, पं. स. सदस्य संतोष राऊत,मा. चेअरमन भाऊसाहेब मावकर, मा. सरपंच सुरेशशेठ गायकवाड, सुभाष पिंपळे, रघुनाथ मराठे,तुशांत ढमाले, एकनाथ आंबेकर,पी एम आर डी सदस्या दिपालीताई हुलावळे, खरेदी विक्री संघ चेअरमन मनिषाताई आंबेकर, सामाजिक कार्यकर्ते गणपतराव केदारी, सामाजिक कार्यकर्ते भागुजी केदारी व सामाजिक कार्यकर्ते मारुती येवले या सर्वांचा पाठिंबा असणार आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page